घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस विभागाची बैठक संपन्न.
घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका व पोलिस विभागाची बैठक संपन्न.
-----------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रजनी कुंभार
-----------------------------
कोल्हापूर ता.09 :- घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जनाकरिता महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येत आहे. या विसर्जनाच्या वेळी विसर्जन मार्गावर व इराणी खण येथे आवश्यकत्या तयारीच्या अनुषंगाने सोमवारी महापालिकेत महापालिका व पोलिस विभाग, सामाजिक संस्था व वाहन ठेकदार यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. हि बैठक महापालिकच्या छ.तराराणी सभागृहात सकाळी 11 वाजता घेण्यात आली. या बैठकीमध्ये महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाने समन्वय ठेऊन काम करुण्याचे ठरविण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, पोलिस उप-अधिक्षक अजित टिके व अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सुरवातील या बैठकीत महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. यामध्ये महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेश उत्सवासाठी पापाची तिकटी व हॉकी स्टेडीयम येथे स्वागत कक्ष, विसर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था, रस्ते पॅचवर्क, कर्मचाऱ्यांच्या तीन शिफ्टमध्ये कामकाजासाठी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पोलिस प्रशासनाला आवश्य त्या ठिकाणी बॅराकेटींग, टॉवर, सीसीटीव्ही व स्टेजची व्यवस्था करण्यात येत असून पोलिस प्रशासनाला या व्यतिरिक्त काही सुविधा आवश्यक असल्यास त्या पुरविण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिस उप-अधिक्षक यांनी रस्त्यावर लावण्यात आलेल्या कमानी पुर्णरस्ता न लावता त्या शॉर्टमध्ये लावण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी वाढत असल्याचे सांगितले. त्यामुळे अशा कमानीवर इस्टेट व अतिक्रमण विभागाने कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पर्यायी मार्गाचा जास्तीजास्त मंडळांनी वापर करणेबाबत नागरीकांना आवाहन करावे. वैद्यकीय पथके तैनात करावीत अशा सूचना केल्या. तसेच अवनी संस्थेच्यावतीने महिलांना मास्क व हॅन्डग्लोज देणेबाबत विनंती केली.
या बैठकीस उप-आयुक्त पंडीत पाटील, सहा.आयुक्त संजय सरनाईक, कृष्णा पाटील, नेहा आकोडे, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नगरसचिव सुनील बिद्री, उपशहर अभियंता रमेश कांबळे, आर के पाटील, महादेव फुलारी, सुरेश पाटील, लक्ष्मीपूरीचे पोलिस निरिक्षक दिलीप पवार, शाहूपुरीचे पोलीस निरिक्षक अजय सिंदकर, राजारामपूरीचे पोलिस निरिक्षक सुशांत चव्हाण, राजवाडाचे पोलिस निरिक्षक संजीवकुमार झाडे, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक अजित तनपुरे, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, सीनियर ऑडिटर वर्षा परीट, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, पर्यावरण अधिकारी अवधूत नेर्लेकर, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपूत, अवनी संस्थेचे जैनुद्दीन पन्हाळकर, संगीता लोंढे, एकटी संस्थेच्या सविता कांबळे, वसुधा संस्थेच्या वनिता कांबळे, बचत गटाचे पुनम हवालदार, सुप्रिया चाळके, सुप्रीया पोतदार उपस्थित होते.
Comments
Post a Comment