गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयावर कारवाई करा: वेस्ट पेपर स्क्रॅप असोसिएशनची मागणी.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयावर कारवाई करा: वेस्ट पेपर स्क्रॅप असोसिएशनची मागणी.
--------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
शशिकांत कुंभार.
--------------------------------
गांधीनगर:- गांधीनगर सह परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या परप्रांतीयांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन वेस्ट पेपर स्क्रॅप असोसिएशनच्या वतीने गांधीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांना दिले. यावेळी अध्यक्ष वीरेंद्र भोपळे उपाध्यक्ष पंडित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
निवेदनात म्हटले आहे की येथील स्थानिक नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परप्रांतीयाकडून अरेरेवी होत आहे. त्यांच्याकडून बाजारपेठेत दहशत माजवली जात आहे. यामुळे परप्रांतीयांची गुन्हेगारी वाढत असून व्यापारी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. ज्या घरमालकांनी अशा परप्रांतीयांना आश्रय दिला आहे त्यांना समज देऊन संबंधितांची कागदपत्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. आणि बेकायदा काम करणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी धर्मेंद्र जाधव, सेक्रेटरी दीपक तिळवे, रामभाऊ साळुंखे, किशोर जाधव सुनील गोसावी सरदार गोसावी अमोल पनुत्रे, राहुल जाधव, सचिन शिर्के, सोनू आदी उपस्थित होते.
फोटो ओळ:- गांधीनगरसह परिसरात दहशत माजवणाऱ्या परप्रांतीयांवर कारवाई करा या मागणीची निवेदन वेस्ट पेपर स्क्रॅप असोसिएशनच्या वतीने गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक जाधव यांना देण्यात आले. यावेळी वीरेंद्र भोपळे, पंडित चव्हाण आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment