बाबा ग्रुप तर्फे गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांनी संपन्न.

 बाबा ग्रुप तर्फे गणेशोत्सव सामाजिक उपक्रमांनी संपन्न.

गांधीनगर परिसरात खेळण्याचे,नाश्त्याचे स्टॉल  वृद्धांसह तरुणाई उत्साहात.

गांधीनगर  : , सार्वजनिक गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गांधीनगर मध्ये गर्दी होत आहे. गांधीनगर रस्ते रात्री उशिरापर्यंत गर्दीने फुलून गेले आहेत. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी पाळणे खेळण्याचे स्टॉल लागले आहेत. आभावृद्धांसह  तरुणांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

 गणेशोत्सवात गांधीनगर शहरात अनेक मंडळांनी आकर्षक वैज्ञानिक, सामाजिक, सांस्कृतिक, पौराणिक देखावे साकारले आहेत. काही मंडळांनी सजीव देखावे ही उभारले आहेत. अनेक मंडळांनी देशातील विविध ठिकाणीच्या मंदिराच्या प्राकृति साकारलेली आहेत.

यातच साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ बाबा ग्रुप,या मंडळाने, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक उपक्रम राबवले झाडे लावा झाडे जगवा उपक्रम,शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप, निराधारांना अन्नधान्य वाटप,महाप्रसादाचे  आयोजन लहान मुलांसाठी  डान्स स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, भाषण स्पर्धा,  नाटक स्पर्धा,  इ. या सामाजिक उपक्रमांमध्ये  माजी‌  उपसरपंच गुंडा वायदंडे, ग्रा.पं.सदस्य दिलीप  थोरात  , मंडळाचे अध्यक्ष आकाश ढेरे, उपाध्यक्ष मुकेश माने,  सेक्रेटरी विनोद कांबळे,  विशाल फुले,  आकाश लोंढे,  विपुल माने,  प्रेम वायदंडे,  सुभाष ढेरे  , साहिल कांबळे,  प्रदीप वायदंडे,  राजू वायदंडे,  गौरव वायदंडे,  संतोष माने  , उदय वायदंडे तसेच बाबा ग्रुप चे  पदाधिकारी, महिलावर्ग  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


फोटो  :  साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे तरुण मंडळ बाबा ग्रुप मंडळाचे पदाधिकारी ( छाया  विशाल फुले )

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.