जिल्हा नियोजन समितीवर डॉ. सुभाषराव जाधव यांची "विशेष निमंत्रित सदस्य "म्हणून निवड.
जिल्हा नियोजन समितीवर डॉ. सुभाषराव जाधव यांची "विशेष निमंत्रित सदस्य "म्हणून निवड.
-------------------------------------
कौलव प्रतिनिधी
संदीप कलिकते
-------------------------------------
शिरगाव (ता राधानगरी) येथील श्री सुभाष विकास सेवा संस्थेचे संचालक व राधानगरी तालुका भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा चिटणीस डॉ. सुभाषराव पांडुरंग जाधव यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर "विशेष निमंत्रित सदस्य" म्हणून नुकतीच निवड झाली. महाराष्ट्र शासनाचे नियोजन विभागाचे उपसचिव नि. भा खेडकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र नुकतेच दिले आहे.
.या कामी त्यांना मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसनसो मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील तालुकाध्यक्ष विलास रणदिवे अखिलेश कांदळकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले डॉ.सुभाषराव जाधव हे गेली २५ वर्षे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते असून यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषद, भोगावती साखर कारखाना व भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ आदि.निवडणुका लढविल्या आहेत. आगामी काळात पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे
Comments
Post a Comment