Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिवाजी पेठेतील वेताळतालीम मंडळाचे आधारस्तंभ,नगरसेवक अजित ऊर्फ पिंटू राऊत ( बॉस ) यांचे आकस्मित निधन.

 शिवाजी पेठेतील वेताळतालीम मंडळाचे आधारस्तंभ,नगरसेवक अजित ऊर्फ पिंटू राऊत ( बॉस ) यांचे आकस्मित निधन.

------------------------------------- 

कौलव प्रतिनिधी

संदीप कलिकते

------------------------------------- 

कोल्हापूर, कोल्हापूर शिवाजी पेठ वेताळमाळ तालीम येथील अजित ऊर्फ पिंटू राऊत यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे.

 शिवाजी पेठेतील अजित राऊत ( बॉस ) हे नेहमी समाज कार्यामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व होते. शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचे सेक्रेटरी होते. वेताळमाळ तालीम मंडळाचे  खाजानीस होते.शिवाजी पेठेतील, कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही सामाजिक कार्यातील आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग आणि मार्गदर्शन असायचे.

 अजित उर्फ पिंटू राऊत बॉस हे दोन वेळा नगरसेवक राहिलेले आहेत.विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, स्थायी समिती सभापती सदस्य, आणि त्यांच्या पत्नी सौ सुनिता अजित राऊत यांनी महापौर पद भूषविले प्राप्त केले आहे. त्यांच्या या अकाली जाण्याने शिवाजी पेठे सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 त्यांच्या पश्चात  आई,पत्नी,मुलगा, मुलगी आणि मोठा मित्र परिवार आहे.


 उत्तर कार्य - 04/09/2024 बुधवार रोजी सकाळी आहे.

Post a Comment

0 Comments