इंगळीत कालपासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण.
इंगळीत कालपासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
इंगळी येथील 2024 साली झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे, गोठा, व्यवसायिक दुकाने या सह आधिभागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पुरग्रस्तांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असता शासनाच्या नियमानुसार पूरग्रस्तांनी स्थलांतर केले होते
मुख्यमंत्री महोदयांनी जे पूरग्रस्त आहेत त्यांना दहा हजार अनुदान जाहीर केले असता इंगळी मधील एकूण 338 पूरग्रस्तांचे पंचनामे तलाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत मधील क्लार्क यांनी पंचनामा झाल्यानंतर त्या पुरग्रस्त पंचनामा यादीतील काही मोजक्याच पूरग्रस्तांना अनुदान मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक ,तलाठी, व क्लार्क यांनी यादीची अफरातफर करत व बड्या नेत्यांना हाताशी धरून जे खरोखरच पूरग्रस्त आहेत तसेच अजुन 25 ते 30 पूरग्रस्तांचे पंचनामे झाले नाहीत अशानाही सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवून बाकीच्यांना अनुदान देण्यासाठी प्रयत्न केला असून त्यासाठी दाह दिवसांपूर्वी पुरग्रस्त बांधवांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत इंगळी, तहसील कार्यालय हातकलंगले, जिल्हाधिकारी कार्यालय ,तसेच सर्कल अधिकारी यांना निवेदनाद्वारे जे पूरग्रस्त सानुग्रह अनुदानापासून वंचित आहेत त्यांना सानुग्रह अनुदान जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करण्याचा निवेदनाद्वारे कळविण्यात आले होते
सदरच्या निवेदनावर ती प्रशासकीय कोणतीच कारवाई न केल्याने दिनांक 25 सप्टेंबर पासून ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत पूरग्रस्तांना सानुग्रह अनुदान मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण च्या वरती ठाम राहण्याचा निर्णय पूरग्रस्तांनी घेतला
शिवसेना इंगळी शहर प्रमुख केशव पाटील
Comments
Post a Comment