खासदार अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल: राहुल गांधीच्या जिभेला चटके देण्याचे विधानभवले, काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन.
खासदार अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल: राहुल गांधीच्या जिभेला चटके देण्याचे विधानभवले, काँग्रेसचे अमरावतीत आंदोलन.
----------------------------------
फ्रंट लाईन् न्यूज महाराष्ट्र
अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
पी एन देशमुख
----------------------------------
अमरावती.
राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वीपाऱ्यास करून त्यांच्याविरुद्ध गरड वोकणारे राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर येथील राजापेठ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्या पवार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पूर्वी याच मागणीसाठी काँग्रेसचे अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे व पक्ष शिष्यांनी आज बुधवारी पोलिस आयुक्ताच्या दलानातआंदोलन केले. या आंदोलनामुळे अमरावती खासदार विरुद्ध खासदार असे चित्र निर्माण झाले आहे. माझी पालकमंत्री आमदार ऑड. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख,प्रा. वीरेंद्र जगताप, दोन्ही जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, बबलू शेखावत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्या पवार, माजी महापौर विलास भाऊ इंगोले, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते मिलिंद चिमटे सहभागी झाले होते. आरक्षण विषयक रस्त्यावरून भाजपचे जिल्हाध्यक्ष असलेले डॉ. बोलले यांनी राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्या, असे वक्तव्य केले आहे. सार्वजनिक ठिकाणी केलेल्या व वक्तव्या मुळे जन माणसात तेढ निर्माण झाले आहे. ते गेल्या तीन-चार महिन्यापासून असेल बेताल विधान करत आहेत. त्यामुळे ,भविष्यातील तेढ टाळण्यासाठी डॉ. अनिल बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्त कार्यालयातील या आंदोलनानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष भैय्या पवार यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी खासदार डॉ. अनिल गोंडे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायालय कलम १९२,३५२(२)३५६(२) अन्न वय गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी ची जिभ छाटू नका, तिला चटके द्या!: आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर भाजप खासदार अनिल गोरे यांचे वादग्रस्त विधानजिभ छाटू नका, तर तिला केवळ चटके द्या, असे वादग्रस्त विधान भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या आमदारानंतर आता भाजप खासदार बोलले यांनी असे विधान केल्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच आपले आहे.
Comments
Post a Comment