Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कुंभोज येथे देवमोरे मळ्यात दिवसा चोरीचा प्रयत्न, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष.

 कुंभोज येथे देवमोरे मळ्यात दिवसा चोरीचा प्रयत्न, पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

कुंभोज तालुका हातकणंगले येथे कुंभोज कोळी मळा रोडवर असणाऱ्या सुभाष देवमोरे यांच्या शेतातील घरामध्ये काही अज्ञात चोरट्यांनी  चोरी करण्याचा आज दिवसा प्रयत्न केला. सकाळी दहा वाजता त्या शेतात कामासाठी असणारे रंगराव काटे हे घराजवळ जात असताना त्या ठिकाणी तीन ते चार व्यक्ती काहीतरी करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यावेळी त्यांनी कोण आहे ,असे विचारले असता सदर व्यक्तींनी त्यांच्यावर शस्त्राने पाठलाग करून वार करण्याचा प्रयत्न केला .यावेळी रंगराव  काटे यांनी तिथून  भिऊन पळ काढून रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांना सदर घटनेची सूचना दिली . यावेळी हातकणंगले पोलिसांना 0230 -48 31 33 या लँडलाईन नंबर वरती फोन करण्याचा प्रयत्न केला असता सदर फोन बंद असल्याचे समजले. परिणामी सदर चोरींच्या घटनाबाबत हातखंडे पोलिसांना गेल्या दोन दिवसापासून सूचना करूनही दर्गेवाडी व मळे भाग परिसरात कोणत्याही पद्धतीची हातकणंगले पोलिसांच्या वतीने ग्रस्त घालण्यात न आल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे.

         यावेळी परिसरातील नागरिकांनी सदर घटना स्थळी धाव घेऊन संपूर्ण व क्षेत्राची पाहणी करून चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी सदर चोरट्याने तेथून शेजारी असणाऱ्या शेतामध्ये पळ काढला परिणामी सदर घटनेमुळे दर्गेवाडी, कोळी मळा, शिंगे मळा, कुंडले मळा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून. हातखंडे पोलिसांनी सदर ठिकाणी रात्री गस्त घालने गरजेचे आहे. परिणामी गेल्या दोन दिवसापासून सदर रोड वरती एम एच 46 असा क्रमांक असणाऱ्या काही टू व्हीलर गाडीवरून काही अनोळखी युवक जनावरांचे केस कापणे, शिंगे कापणे अशा वेगवेगळी कारणे सांगून शेतीच्या वस्तीमध्ये फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्याच पद्धतीने दुर्गेवाडी येथे रात्री दोन वाजनाच्या सुमारास टू व्हीलर वरून दोन ते तीन अर्धनग्न नागरिक अंगाला काळे फासून प्रवास करत असल्याचेही काही नागरिकांनी बघितले आहे.तसेच सदर घटना  सी सी टिव्हित कैद झाली आहे त्यामुळे कुंभोज सह परिसरातील तसेच मळे भागातील नागरिकांनी दक्ष राहण्याचा इशारा हातकणगले पोलीस स्टेशन व कुंभोज ग्रामपंचायतच्या वतीने नागरिकांना देण्यात आला आहे. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे

Post a Comment

0 Comments