स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांची तृतीय पुण्यस्मरण बाहुबली विद्यापीठ येथे साजरा.
स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांची तृतीय पुण्यस्मरण बाहुबली विद्यापीठ येथे साजरा.
------------------------------
कुभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
एम जी शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज बाहुबली येथे स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांची तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रम संपन्न झाला....
गुरुकुल प्रणालीचे प्रणेते परमपूज्य 108 समंतभद्र जी महाराज यांनी स्थापन केलेल्या या बाहुबली संस्थेचे नावलौकिक करण्याचे कार्य भिशीकर गुरुजी करके गुरुजी गजाबेन अर्थात बेडगे गुरुजी अशा अनेकांचे योगदान यामध्ये आहे.
आज बीटी बेडगे गुरुजींची तिसरी पुण्यतिथी यांच्या जीवनाविषयी माहिती द्यावयाचे झाल्यास त्यांचा जन्म 8एप्रिल 1933 मध्ये झाला. पाचवी पर्यंतचे शिक्षण गावाकडे झाले पण सहावी पासूनचे शिक्षण घेण्यासाठी ते बाहुबली येथे आले सहावी ते दहावी बाहुबली मध्ये शिक्षण घेऊन पुढील शिक्षणास ते सोलापूर महाविद्यालयात आपले पदवी शिक्षण पुणे विद्यापीठात पूर्ण केले त्यांनी या महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अर्थात पदवी परीक्षेत द्वितीय क्रमांक पटकावला तेव्हा डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांचा सन्मानही झालेला होता. त्यानंतर 1958- 59 मध्ये पुन्हा बाहुबलीत आले पण त्यानंतर सहकारी खात्यामध्ये त्यांना नोकरी मिळाली. 1958 ला ती नोकरी सोडून परमपूज्य गुरुदेवांच्या शब्दास मान ठेवून ते पुन्हा 1960 मध्ये परत बाहुबली आले त्यांनी 1968 पासून 1991 पर्यंत 23 वर्ष मुख्याध्यापक म्हणून देखील काम पाहिले एक खंबीर नेतृत्व आकर्षक व्यक्तिमत्व कर्तव्याला अग्रक्रम देणारे सर्वस्वी शाळेस आपलं समजून कार्य पूर्णत्वास नेणारे बी टी बेडगे गुरुजी आज जी शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज हे नावारूपाला आणले त्याचे सर्व श्रेय गुरुजींना जाते नियोजन दूरदृष्टी नेतृत्व हे तर त्यांच्या अंगी होतेच
या त्यांच्या कार्यामुळेच तर संस्थेचा तसेच शाळेचाही नावलौकिक होण्यास मदत झाली
2003 ते 2021 पर्यंत त्यांनी संस्थेमध्ये संचालक म्हणूनही काम पाहिले एवढेच नव्हे सन्मती मासिक याचेही काम पाहत होते. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आर्थिक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी श्री बाहुली सेवकांची पतसंस्था याची स्थापना केली. वेळेबाबत असणारा काटेकोरपणा ज्ञानदानाचे पवित्र काम असे ज्यांच्या हातून घडले ते म्हणजे बी टी बेडगे गुरुजी गुरुकुल विद्यार्थी पासून ते संचालक पर्यंत त्यांनी संपूर्ण प्रवास अतिशय सुंदर रित्या नियोजनात्मक पूर्ण केला खरं तरी निर्व्यसनामुळेच त्यांना दीर्घायुष्य लाभले एकूणच आपल्या जीवनामध्ये कामाविषयी असणारी तळमळ दिसून येते.
या या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रशाळेचे उपमुख्याध्यापक श्री अनिल हिंगलजे श्री ए ए चौगुले सर त्याचबरोबर श्री.रवींद्र चौगुले शिक्षक शिक्षिका विद्यार्थि उपस्थित होते.
गुरुजींच्या विषयी मनोगत सौ.एस एस निटवे यांनी व्यक्त केले. आभार श्री जुगळे सर यांनी मानले.
Comments
Post a Comment