किसन वीर महाविद्यालयात केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन.
किसन वीर महाविद्यालयात केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन.l
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने केशव सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या शुभहस्ते प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, उपप्राचार्य डॉ. हनुमंत कणसे, प्रो. डॉ. सुनील सावंत, प्रो. डॉ. ज्ञानदेव झांबरे,डॉ. शिवाजी कांबळे,डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. राहुल वळीव, डॉ. शिवाजी ताटे, डॉ. अरुण सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती होती.
सीताराम ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, विचारवंत, मराठी पत्रकार, प्रभावी वक्ते, राजकारणी व लेखक होते. त्यांनी समाजातील अंधश्रध्दा, बालविवाह, अस्पृश्यता, हुंडाप्रथेच्या विरोधात चळवळ उभी केली व लेखनही केले. त्यांचे संयुक्त महराष्ट्रातील योगदान मोठे आहे. राजर्षी शाहू महाराज व महात्मा जोतिबा फुले हे त्यांचे प्रेरणास्थान होते. 'सत्यशोधक समाजाची तळपती तलवार' म्हणून त्यांची ओळख होती.ते क्रांतीकारी विचारांचे होते. ते समता व सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते होते. असे उद्गार डॉ. गुरुनाथ फगरे यांनी काढले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. राजेंद्र जयकर, प्रा. संदीप पातुगडे, डॉ. संदीप वाटेगावकर, प्रा. जयवंत खोत, प्रा. सचिन गरगडे, प्रा. जयवंत पवार प्रा. सोमनाथ सानप, श्री. भानुदास चौधरी श्री. जितेंद्र चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment