गांधीनगर मध्ये एकमेकांना शिवी देण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी परस्परविरोधी फिर्यादी दाखल.

 गांधीनगर मध्ये एकमेकांना शिवी देण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी परस्परविरोधी फिर्यादी दाखल. 

-------------------------------

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

-------------------------------

गांधीनगर:- गांधीनगर मध्ये एकमेकांना शिवी देण्याच्या कारणावरून दोन गटात काठ्यांनी हाणामारी झाली. ही घटना शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गांधीनगरातील शिरू चौकात घडली. याबाबत दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या .


याबाबतच पोलीसांच्या कडून मिळालेली माहिती अशी की, हर्ष महेश धणकानी (वय २१, गांधीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हर्ष यांचे मित्र मुरली डेंबडा यांच्याशी जय अमर धामेजा, धीरज अमर धामेजा (दोघेही रा. गांधी पुतळा, गांधीनगर), अशोकलाल पारुमल धामेजा, करण अशोकलाल धामेजा (दोघेही रा. शिरु चौक, गांधीनगर) हे भांडण करत एकमेकांना शिवगाळ करत होते. हर्ष हे भांडण सोडविण्यासाठी गेले असता त्यांनी हर्ष यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन स्टीलच्या कड्याने डोक्यात वार करुन जखमी केले. तर करण अशोकलाल धामेजा (वय २०) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सी.आर. सेव्हन क्लबच्या श्रीगणेश उत्सव मंडपामध्ये बसले असताना मुरली राजू डेंबडा, राजू मोहनलाल डेंबडा (दोघेही रा. जुने पोस्ट ऑफिस, गांधीनगर), हर्ष महेश धनकानी, पियुष जयसिंघानी (रा. जुनी गोशाळा, गांधीनगर) यांनी त्यांना बाहेर बोलावून घेऊन त्यांच्या पायावर, दंडावर काठीने मारहाण केली. मारहाणीचा आवाज ऐकून करण यांचे चुलतभाऊ धीरज, जय, अशोक हे आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी शिवीगाळ करुन मारहाण केली. याबाबत गांधीनगर पोलीसांत दोन्ही गटांकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोन्ही गटातील आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीधर सावंत करत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.