मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात भाषाभ्यास मंडळाची स्थापना.
मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयात भाषाभ्यास मंडळाची स्थापना.
-------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
-------------------------------
स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि. 14 सप्टे. 2024 रोजी हिंदी दिनाचे औचित्यसाधून भाषाभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. बी.आर.तनपुरे यांची उपस्थिती होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. पी.एस.पाथरकर, डॉ. एस. व्ही. रूक्के, डॉ. फिरोज खान, डॉ. व्ही. एन. लांडे व प्रा. बी. डी. पट्टेबहाद्दूर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. आपल्या प्रास्ताविकातून हिंदी विभाग प्रमुख डॉ. एस. व्ही. रूक्के यांनी हिंदी दिनाचे महत्व विशद केले. हिंदी भाषा ही आपली राजभाषा असल्याने, देशातील प्रत्येक नागरिकांनी या भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ही भाषा इतर भाषांच्या तुलनेत आत्मसात करण्यासाठी सोपी व सहज असल्याचे सांगितले. याप्रसंगी त्यांनी हिंदी अभ्यासमंडळाची घोषणा केली. ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून मुस्कान सुभान भवाणीवाले,सचिव म्हणून पल्लवी गजानन खिल्लारे, कोषाध्यक्षपदी रिसिका भगत, तर सदस्य म्हणून ललिता खिल्लारे, अजय इंगोले, करीना भगत, आरती गोटे, आयशा अनम, संघर्ष खिल्लारे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर उर्दू विभाग प्रमुख डॉ. फिरोज खान यांनी उर्दू अभ्यास मंडळाची घोषणा केली. ज्यामध्ये अध्यक्ष म्हणून शमाईल परवीन, उपाध्यक्ष म्हणून मो. रूहबानोद्दिन, सचिव म्हणून सारीया समन, कोषाध्यक्ष म्हणून इकरा फिरदौस, तर सदस्य म्हणून आयेशा अनम, बीबी अमेना, सबा नाज, झुनेरा अंबर, दिलनवाज परवीन यांची निवड करण्यात आली. इंग्रजी अभ्यास मंडळाची कार्यकारिणी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी.एस. पाथरकर यांनी घोषित केली. ज्यामध्ये अध्यक्षपदी वैष्णवी डुबे, उपाध्यक्षपदी राणी डुबे, सचिवपदी वैष्णवी ठाकरे, सदस्य म्हणून पल्लवी वानखेडे, आर्यन चव्हाण, वैभव मापारी, शिवम बोडखे, वल्लभ कौंडिल्य, आदित्य आरू, प्रशिक पट्टेबहाद्दूर, विक्की गोरे, ओमकार जाधव यांची निवड करण्यात आली. मराठी अभ्यास मंडळाची घोषणा डॉ. विष्णू लांडे यांनी केली. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून गायत्री कांबळे, उपाध्यक्ष म्हणून विजया खंडारे, सचिवपदी आदित्य गायकवाड, तर सदस्य म्हणून विवेक हुपाडे, निलेश इंगळे, सूरज ठाकरे, सपना मोरे, वैशाली राऊत, ललिता खिल्लारे, गणेश कर्डिले यांची निवड करण्यात आली. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून डॉ. बी.आर.तनपुरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण व्यक्तिमत्वाचा विकास विविध भाषेमुळेच होत असल्याचे सांगितले. समाजातील प्रत्येक जण हा बहुभाषिक असणे गरजेचे झाले आहे. भाषेमुळेच आपल्याला अभिव्यक्त होता येते. भाषा जर नसती तर मानवाची प्रगती झाली नसती. भाषाभ्यास मंडळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी चारोळी, कविता, कथालेखन, सुविचारलेखन, भिंतीपत्रक तयार करून आपली भाषा अधिकाधिक प्रगत केली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बी.डी. पट्टेबहाद्दूर यांनी केले.
Comments
Post a Comment