क !! ठाणे येथे स्व.कै. जयसिंगराव यशवंत पाटील दादा फौंडेशन च्या वतीने स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न.
क !! ठाणे येथे स्व.कै. जयसिंगराव यशवंत पाटील दादा फौंडेशन च्या वतीने स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न.
---------------------------------------------
पन्हाळा प्रतिनिधी
आशिष पाटील
-------------------------------------------
क।।ठाणे (ता.पन्हाळा) येथे, स्वर्गीय कै.जयसिंगराव यशवंत पाटील दादा, यांच्या फौंडेशन मार्फत, आयोजित क।।ठाणे गावातील सन 2023-24 सालात स्पर्धा परीक्षेत, शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या तसेच शासकीय निमशासकीय सेवेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळ्यास कर्तव्यदक्ष करवीर चे मा.आम.चंद्रदीप नरके, युथ आयकॉन मा. राजवीर नरके साहेब उपस्थित होते .
गुणवंतांचा सत्कार व्हावा आणि त्यातून प्रेरणा घेऊन गावातील पुढची पिढी तयार होत जावी हा दृष्टिकोन ठेऊन मा.अनिष पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी करत असलेले हे काम कौतुकास्पद आहे. स्व.जयसिंगराव यशवंत पाटील दादा फौंडेशच्या संपूर्ण टीमला, त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मा.आम.चंद्रदीप नरके साहेब यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्व.जयसिंगराव यशवंत पाटील दादा फौंडेशचे अध्यक्ष अनिष पाटील, केदारलिंग विकास सेवा संस्थेचे मा.चेअरमन बाबासो पाटील,युवा नेते युथ आयकॉन राजवीर नरके साहेब , यशवंत सहकार समूहाचे सर्व पदाधिकारी, सत्कारमूर्ती,युवा वर्ग,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment