अनंत कालावधीनंतर विजय श्री कोणाकडे? प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल स्थितीची प्रतीक्षा.

 अनंत कालावधीनंतर विजय श्री कोणाकडे? प्रतिकूल परिस्थितीत अनुकूल स्थितीची प्रतीक्षा.

---------------------------- 

रिसोड. प्रतिनिधी 

रणजीत ठाकूर 

---------------------------- 

 विधानसभा निवडणूक 2024 चा बिगुल वाजला असून सर्वच राजकीय पक्षातील निवडणूक लढविण्यास इच्छुक असणारे तथाकथित नेते व कार्यकर्ते आपल्या पक्षश्रेष्ठी कडे यथाशक्ती उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. याला काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान आमदार अमित झनक मात्र अपवाद आहेत.आमदार अमित झनक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.त्यांना तसा कोणी प्रतिस्पर्धीही नाही आणि त्यांची उमेदवारी कापावी असे ठोस कोणतेच कारण नाही. त्यांनी मोदी लाटेतही निवडून येऊन स्वतःला सिद्ध केले आहे.माजी मंत्री स्व.सुभाषराव झनक यांच्या आकस्मिक मृत्युंनंतर रिसोड मतदार संघातील मतदारांनी सतत दोन वेळा अमित झनक यांच्यावर विश्वास टाकला आहे. झनक यांनी कोणती विकासाची कामे केली किंवा नाही केली याचा हिशोब जनता मागणार नसली तरी विरोधी पक्षातील मात्र नक्कीच मतदार संघाच्या विकासाचा आढावा जनतेसमोर मांडतील आणि झनक यांना अडचणीत आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील आणि तो विरोधक म्हणून करायला ही पाहिजे.विरोधकांना मागील अनेक वर्षानंतर

 काँग्रेसच्या बालेकिल्ला असलेल्या रिसोड विधानसभा मतदार संघावार विजय मिळविण्याची संधी चालून आली आहे. परंतु संधीचा उपयोग योग्य घेण्यासाठी विरोधकांचा आपसी ताळमेळ मजबूत असला पाहिजे तरच ते शक्य होईल परंतु मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपा मध्ये उमेदवारी मिळण्यावरून चांगलीच रस्सीखेच होईल असे चित्र आहे. महायुतीच्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना यांनीही या मतदार संघ आपल्याकडे असावा अशी मागणी केली आहे तर विजयाची शास्वती पाहता भारतीय जनता पार्टी च ही जागा लढवेल हे निश्चित आहे.

भाजपा कडून तिकीट मिळावे यासाठी माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. केवळ प्रवेशच केला नाही तर त्यांचे सुपुत्र ऍड नकुल देशमुख यांना सामोरे करुन विधानसभा क्षेत्रात वातावरण निर्मिती सुद्धा केली आहे. मा. खा अनंतराव देशमुख यांचा हक्काचा कार्यकर्ता विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात आहे परंतु मुळचा भाजपा कार्यकर्ता आजही देशमुख यांच्यापासून समांतर अंतर ठेवून दुरावा ठेवत आहे कदाचित पक्षश्रेष्टीच्या आदेशाची वाट पाहत असावा. या मूळच्या भाजपा कार्यकर्त्याला माजी आमदार विजयराव जाधव यांच्याशी आपुलकी जास्त वाटतं आहे त्यामुळे एका गटाच्या किंवा हितचिंतकाच्या आग्रहास्तव माजी आमदार विजयराव जाधव मतदाराशी असलेली नाळ अधिक घट्ट करित आहेत. अर्थात ते संघाशी व पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे पक्षश्रेष्ठी चा आदेश त्यांना सर्वतोपरी असेल परंतु विजयराव विजयश्री खेचून आणण्याचा दमखम ठेवतात हे तेवढेच खरे आहे. भाजपाला जर जुन्या कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास वाटला तर मात्र विजयराव जाधव यांची उमेदवारी टाळणे शक्य नाही. आणि असे झाले तर भाजपा मध्ये जाऊनही अनंतराव देशमुख यांना पुन्हा काँग्रेस मध्ये असतानाचा पाठ गिरवावा लागण्याची वेळ येणार आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणारा रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघ पुन्हा काँग्रेसकडे राहतो की भाजपा ला अनंत कालावधीनंतर मिळालेली संधी विजय श्री खेचून आणण्यात यशस्वी होते हे सांगणे कठीण आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा ला परिस्थिती प्रतिकूल असली तरी ती अनुकूल करण्यासाठी भरपूर वेळ आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.