श्री हनुमान मित्र मंडळाने डॉल्बी ला फाटा देत दिला महिला सक्षमीकरण्यासाठी सामाजिक संदेश.

 श्री हनुमान मित्र मंडळाने डॉल्बी ला फाटा देत दिला महिला सक्षमीकरण्यासाठी सामाजिक संदेश.

----------------------------------------- 

फ्रंटलाई न्युज महाराष्ट्र 

शिरोली प्रतिनिधी 

अमित खांडेकर 

----------------------------------------- 

नागाव  -छत्रपती संभाजी नगर नागाव येथील श्री हनुमान मित्रमंडळाने डॉल्बी ला फाटा देत महिला ना अग्रभागी करत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन केले 

यावेळी महिलांच्या वर होणारे अत्याचार ,बाल अत्याचार , लव्ह जिहाद , सार्वजनिक उत्सवाचे होणारे विद्रुपीकरण या आणि अशा विविध विषयांवर  जनजागृती करत  फलक हातात घेत मिरवणुकीत सहभागी होत मोठ्या प्रमाणात घोषणा देत परिसर दणाणून सोडला 

पारंपारिक ढोल ताश्याच्या गजरात आबाल - वृध्दना सोबत घेत भव्य  अशी श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढत सामाजिक संदेश देत वेगळेपणा जपत मंडळाच्या वतीने श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करणेत आले 

या वेळी मंडळाचे मार्गदर्शक श्री अभिजित कुलकर्णी - श्री सर्जेराव डाफळे ,बसवराज  मगदूम, श्री संभाजी डाफळे, सातापा  वासकर,विनायक पारगावे, रॉबिन्सन लंबे ,अनिल तराळ, शुभम डाफळे, नागेश कोरे, संजय राठोड , सागर कांबळे, शिवरुद्र हिरेमठ , भीमसेन कांबळे, संभाजी  गोंधळे, संकेत डाफळे , दीपक माळी , रोहित शिंदे , शंकर शिंदे , मारुती राठोड ,  बालाजी भाविमनी , मल्लेश गानिगेर, रंजीत गोधडे,

आदीच्या सह मंडळाच्या कार्यकर्त्यांना घेत मोठ्या प्रमाणत महिला  भगिनी सहभागी झाल्या होत्या

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.