कुंभोज येथे डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा झाल्यास एक आदर्श निर्माण होईल- हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मुमोने.

 कुंभोज येथे डॉल्बीमुक्त गणेश उत्सव साजरा झाल्यास एक आदर्श निर्माण होईल- हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मुमोने.

---------------------------- 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे 

------------------------------ 

कुंभोज सह परिसरात गणेशोत्सव साजरा करत असताना तो कायद्याच्या चौकटीत बसून साजरा करावा परिणामी कुंभोज गाव हे कर्मवीर भाऊराव पाटील यांची जन्मभूमी असून सतू भोसले यांची कर्मभूमी आहे या भूमीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा झाल्यास खऱ्या अर्थाने हातकलंगले तालुक्याला एक आदर्श मिळेल असे उद्गार हातकणंगले पोलीस स्टेशनचे नूतन पोलीस निरीक्षक शरद मुमोने यांनी बोलताना व्यक्त केले 

  ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे ग्रामपंचायत कुंभोज येथे आयोजित गणेशोत्सव शांतता बैठकीच्या प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुंभोज गावच्या सरपंच सौ स्मिता चौगुले होत्या. यावेळी कुंभोज गावात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करावा त्याच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत असताना सर्व कायदेशीर नियमांचे पालन करावे, रहदारीस व गावातील नागरिकांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची मंडळांनी काळजी घ्यावी. गणेश आगमन व विसर्जन मिरवणुका शांततेत काढाव्यात. अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील व पत्रकार विनोद शिंगे यांनी कुंभोज येथे साकारत असलेल्या नुतन गणेश मंदिरासाठी कुंभोज येथील सर्वच तरुण मंडळांनी वायफळ खर्चाला फाटा देऊन गणेश मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे असे आव्हान केले. त्याचबरोबर कुंभोज सह परिसरात सध्या चोरीच्या भीतीने नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस यंत्रणे बरोबरच कुंभोज नागरिकांनीही काही गोष्टी जबाबदारीने पाळाव्यात आपापल्या परिसरात ग्रस्त घालावी व नागरिकांना जागरूक राहण्यास विनंती करावी असे मनोगत व्यक्त केले.

        यावेळी उपसरपंच अशोक आरगे ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब पाटील, विनायक पोद्दार, दावीत घाटगे सदाशिव महापुरे, भरत भोकरे ,अजय देवमोरे, रविराज जाधव,संजय जाधव महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी, राजाराम कारखाना संचालक अमित साजणकर, विजयकुमार भोसले ,तंटामुक्त कमिटी अध्यक्ष बाळासाहेब डोणे, पोलीस पाटील मोहम्मद पठाण, सुरेश भगत , गोपनीय पोलीस संग्राम पाटील, सुदर्शन चौगुले, अनिकेत चौगुले तसेच ग्रामस्थ गावातील सर्व तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मुमोने यांचा सत्कार उपसरपंच अशोक आरगे व किरण माळी यांच्या हस्ते करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.