बिद्री गावच्या सरपंच पदी पूजा पाटील.
बिद्री गावच्या सरपंच पदी पूजा पाटील.
----------------------------
बिद्री प्रतिनिधी
विजय कांबळे
----------------------------
बिद्री ता. कागल येथे आज सरपंच पदासाठी मंडल अधिकारी माधव व्हरकट यांच्या अध्यक्षतेखाली पूजा पाटील यांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली.त्या माजी खासदार संजय मंडलिक गटाच्या आहेत. बिद्री ग्रामपंचायतीची निवडणूक २०२१ मध्ये झाली होती मंडलिक गट व हसन मुश्रीफ गटाने एकत्र येऊन ह्या निवडणूकीत बहुमत मिळविले होते.स्थानिक नेत्यांच्या पंचवार्षिक नियोजनानुसार सरपंच पदी पूजा पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी मावळते सरपंच पांडुरंग चौगले उपसरपंच आनंदा पाटील, अशोक पवार, सागर कांबळे, शोभा चौगले, शितल गायकवाड, सुशांत चौगले, शोभाताई पाटील, सुलोचना पाटील, उपस्थित होत्या.यावेळी ग्रामसेवक बी के कांबळे यांनी स्वागत केले तर विद्यमान सदस्य शहाजी गायकवाड यांनी आभार मानले
Comments
Post a Comment