जावली तालुक्यातील ४४८ लाभार्थीना सत्तर लाखांचे ४०५४ साहित्याचे वाटप.
जावली तालुक्यातील ४४८ लाभार्थीना सत्तर लाखांचे ४०५४ साहित्याचे वाटप.
--------------------------------
जावली प्रतिनिधी
शेखर जाधव
--------------------------------
वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिकांना मिळाला लाभ – सौरभ शिंदे
सातारा
मेढा :- केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजना ही
ही शासनाची अत्यंत उत्कृष्ट योजना असून आयुष्याच्या शेवटी जीवन जगताना जेष्ठ नागरिकांना कोणाच्यातरी आधाराची गरज असते हा आधार साहित्याच्या माध्यमातून या योजनेतून मिळाला असून जावली तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांना या वयात आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वाटप करून म्हातारपणात या ज्येष्ठ नागरिकांना जगण्याचा आधारच मिळाला असल्याचे प्रतिपादन प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी व्यक्त केले
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम अलीमको या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय वयोश्री योजना योजनेतून जावली तालुक्यातील वरिष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधनांचे वाटप जावली
पंचायत समिती सभागृहात करण्यात आले त्यावेळी शिंदे बोलत होते यावेळी बाजार समितीचे सभापती जयदीप शिंदे, युवा नेते सागर धनावडे, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र जगताप, अलिमको संस्थेच्या व्यवस्थापक अभिलाषा ढोरे, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष शशिकांत गुरव सावलीचे सरपंच विजय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते
गटविकास अधिकारी मनोज भोसले म्हणाले केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ७० लाख रुपयांचे जावली तालुक्यातील ४४८ वयोवृद्ध लाभार्थ्यांना चार हजार चोपन्न वस्तूंचे वाटप करण्यात आले एकूण २२ प्रकारचे साहित्य वयोश्री योजनेत वाटप करण्यात आले यामध्ये सिलिकॉन फोम उशी, कृत्रिम दात, गुडघ्याचा पट्टा, मानचा पट्टा, कमरेचा पट्टा, कानाची मशीन, चष्मा, कोपर
कुबड्या, काखेच्या कुबड्या, चालण्याची काठी , समायोजक चालण्याची काठी, चेअर स्टूल, व्हील चेअर, वॉकर, टेट्रापॉड, ट्रायपॉड, पाठीचा पट्टा , चालणारी काठी, आधी वस्तूंचा समावेश असून म्हातारपणात वयोवृद्ध नागरिकांना ज्या वस्तूंची गरज लागते त्याच वस्तूंचं वाटप या योजनेतून करण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले
अलीमको संस्थेच्या व्यवस्थापिका अभिलाषा ढोरे यांनी वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या साहित्याची माहिती सांगितली तसेच भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम ही संस्था भारत सरकारच्या अंतर्गत संस्था असून हे सर्व साहित्य ही संस्था बनवते व शासनाच्या माध्यमातून वयोवृद्धांपर्यंत पोहोचवते असे सांगितले यावेळी संस्थेच्या डॉ. गौरी साळुंखे डॉ. विजय मार्कड डॉ. स्नेहल चौगुले डॉ. रुक्मिणी सोनवणे, अमर मर्देकर, पंचायत समितीचे सर्व अधिकारी यांच्यासह तालुक्यातील शेकडो वयोवृद्ध नागरिक उपस्थित होते अमित पवेकर यांनी सूत्रसंचालन केले तर विस्तार अधिकारी दिगंबर सुरवसे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment