उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांची १२ सप्टेंबर रोजी जाहीर सभा.
उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलुख मैदानी तोफ संजय राऊत यांची १२ सप्टेंबर रोजी जाहीर सभा.
------------------------------
लोहा प्रतिनिधि
अंबादास पवार
------------------------------
▪️लोहा -कंधार शिवसेना विधानसभा निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदाणी तोफ, गद्दाराच्या टोळीला पुरून उरणारा लढवय्या शिवसेना नेते. खासदार संजय राऊत यांची दि. १२ सप्टेब़र रोजी सकाळी ११ वाजता लोहा येथील राधाई मंगल कार्यालयात येथे आयोजीत करण्यात आली आहे त्या अनुषंगाने लोहा येथील शिवसेना मध्यवर्ती शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ दादा पवार यांनी दिली असुन त्यांच्या समवेत विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित रहाणार असल्याची माहिती शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी दिली.
जाहिर पत्रकार परिषदेत बोलताना राज्य संघटक एकनाथ दादा पवार म्हणाले दाजी-भावजीच्या कचाट्यातुन लोहा-कंधार मतदार संघाला काढण्यासाठीशिवसेनेची मुलुख मैदानी तोफ दि १२ सप्टेंबर रोजी धडाडणार आसुन, या सभेसाठी विविध समित्या स्थापन केल्या असुन लोहा शहरात शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची जाहिर सभा होणार या सभेच्या यशस्वीते साठी लोहा कंधार विधानसभेतील शिवसैनिक अहोरात्र परिश्रम करत आहेत अशी माहिती शिवसेना राज्य संघटक एकनाथ दादा पवार यांनी दिली यावेळी. विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पा.कदम विधानसभा संघटक साहेबराव काळेसर,विक्रम कदम सर,माजी जि.प. सदस्य बालाजी परदेशी, लोहा न.पा गटनेते पंचशिल कांबळे,अभी वाघमारे, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिंगाबर इगोले लोहा तालुकाप्रमुख संजय पा ढाले,कंधार तालुकाप्रमुख सचिन पा.पेठकर,लोहा अल्पसंख्याक तालुकाप्रमुख पठाण मुस्तफा, शहरप्रमुख खंडू पा पवार,युवासेना तालुकाप्रमुख,गजानन पा. मोरे, गोविंद ढाकणीकर, कंधार तालुकाप्रमुख संदिप काळंब,राम पाटील पवार मुरंबीकर, बालाजी पा पवार, पंडीत फाजगे,सय्यद अजिज,किरण गव्हाणे,हनुमंत कोकरे,दिगाबंर उगले,योगेश गोरे, सोहेल पठाण, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment