न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ / २५ ची पालक -शिक्षक -विद्यार्थी सभा मोठ्या उत्साहात संपन्न.
न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४ / २५ ची पालक -शिक्षक -विद्यार्थी सभा मोठ्या उत्साहात संपन्न.
---------------------------------
शाहुवाडी तालुका प्रतिनिधी
आनंदा तेलवणकर
---------------------------------
शाहुवाडी :- न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण या शाळेत २०२४ / २०२५ शिक्षक पालक विद्यार्थी सभा संपन्न झाली सभेला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता सभेच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एन एन काळोलिकर सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बी एम पाटील व सामाजिक कार्यकर्ते नामदेव पवार होते या सभेमध्ये दहावी ब चे वर्गशिक्षक अमित पाटील सर यांनी दहावीच्या परीक्षेला सामोरे जाताना तर दहावी अ चे वर्गशिक्षक एस एस बाडे सर यांनी दहावी व भविष्यातील करिअर तर माननीय मुख्याध्यापक यांनी तिमाही निकाल व मुला मुलींच्या सुरक्षते विषयी काय काळजी घेता येईल तसेच मुलांच्या गुणवतेबद्दल चर्चा केली तसेच या सभेमध्ये माननीय लक्ष्मण गुरव यांनी नूतन मुख्याध्यापक काळोलिकर सर यांचे अभिनंदन केले तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढीकरता इतर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन केले एसपी पाटील सर यांनी प्रस्तावना व संतोष पाटील सर यांनी आभार व्यक्त केले यावेळी रत्नाकर कांबळे,माधव कांबळे,विशाल तुरंबेकर सर,महेंद्र मगदूम,बाळू पाटील,सुरेश पाटील असे शिक्षक,व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
Comments
Post a Comment