एल. बी. एस. कॉलेज मधील एन. एस. एस. विभागामार्फत संगम माहुली येथे प्रदूषण मुक्त गणेश उत्सव व स्वच्छता मोहीम.
एल. बी. एस. कॉलेज मधील एन. एस. एस. विभागामार्फत संगम माहुली येथे प्रदूषण मुक्त गणेश उत्सव व स्वच्छता मोहीम.
--------------------------------------
सातारा प्रतिनिधी
शेखर जाधव
--------------------------------------
/जावली :- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मार्फत संगम माहुली येथे प्रदूषण मुक्त गणेश उत्सव व स्वच्छता मोहीम रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित केली. स्वच्छते दरम्यान एक ते दीड टन कचरा गोळा केला व संगम माहुली ग्रामपंचायतीच्या मदतीने कचरा डेपोत पाठवण्यात आला.
संगम माहुली येथे गणपती व गौरी विसर्जनानंतर कृष्णा नदीवर भरपूर प्रमाणात निर्माल्य, प्लास्टिक इ. कचरा टाकला जातो. पर्यावरणाचे संवर्धन म्हणून लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे एन. एस. एस. विभाग दर वर्षी प्रदूषण मुक्त गणेश उत्सव व स्वच्छता मोहीम राबवत असतो व स्वच्छतेचे महत्व सर्व नागरिकांना सांगितले जाते. एन. एस. एस. च्या स्वयमसेविका अमृता पिंपळे, अक्षता माने, अर्पिता भिलारे यांनी सर्व भाविकांना कृष्णा नदीच्या काठावर पर्यावरणा संदर्भात जागृती केली .राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. पी. आर. जाधव, सदस्य प्रा.शेलार एस. एस. व प्रा. मयूर धारक यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या ठिकाणी प्लास्टिक गोळा करणे, निर्मल्य एकत्रिकरण, विसर्जित मूर्तींचे एकत्रीकरण करण्यात आली यासाठी ४० स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी सहभाग घेतला यामध्ये अंदाजे एक ते दीड टणापर्यंत कचऱ्याचे एकत्रीकरण करून कचरा डेपो येथे पाठवण्यात आला. सदर स्वच्छतेमध्ये संगम माहुली येथील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले या सर्व उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Comments
Post a Comment