सार्वजनिक गणेश विसर्जन आधी खड्डे मुजवा अन्यथा आंदोलनचा इशारा.
सार्वजनिक गणेश विसर्जन आधी खड्डे मुजवा अन्यथा आंदोलनचा इशारा.
--------------------------------
मुरगूड प्रतिनिधी
जोतीराम कुंभार
--------------------------------
देवगड निपाणी महामार्ग मुरगुड येथील नाका नंबर एक जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या मार्गावरून मुरगुड शहरातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पार पडतात एखाद्या वेळेस या खड्ड्यात ट्रॅक्टर जाऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लवकरात लवकर हे खड्डे बुजवावेत अन्यथा मोठे जन आंदोलन उभारू असा इशारा मुरगुड शहरातील नागरिक आणि शिवभक्त यांनी दिला. जितेंद्र सिंग ग्रुप मार्फत या संपूर्ण महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला रस्ते बांधल्यानंतर त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे ग्रुपने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे अनेक वेळा निवेदन देवूनही त्याच्यावर योग्य ती कार्यवाही झाली नाही यामुळे संतप्त नागरिकांनी लवकरात लवकर हे खड्डे न बुजवल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला सदर निवेदन मुरगुड पोलीस स्टेशनला ही सादर करण्यात आले यावेळी सुखदेव येरूडकर , शिवभक्त सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, जगदिश गुरव,धीरज सावर्डेकर, अभिजीत देवळे, सुहास देवळे, शंकर जोंधळे,सुहास देवळे,शंकर वर्मा,सुरेश देवळे, महादेव घोडके, रणजीत पाटील,योगेश चौगुले, सुरेशराव देवळे,नामदेव माने , गोविंद मोरबाळे, राजू जाधव,बाबसो देवळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment