पुलाची शिरोली येथे पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पतीची पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या.
------------------------------
नागाव प्रतिनिधी
अमित खांडेकर
------------------------------
पुलाची शिरोली येथे पत्नीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून पतीची पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या.
पुलाची शिरोली तालुका हातकणंगले येथील कोरगावकर कॉलनी पतीने पत्नीच्या डोक्यात हातोड्याची घाव घालून पत्नीला गंभीर जखमी केली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली दरम्यान पतीने पंचगंगा नदीपत्रात उडी मारून आत्महत्या केल्याचे समजते. सागर गोपाळ कोळवणकर वय वर्षे 35 हा कोरेगावकर कॉलनी ते भाड्याच्या घरात पत्नी मनीषा आणि दोन मुलासह राहतो ,एमआयडीसी येथे एका कंपनीतून नोकरी करत होता. दोन दिवसापूर्वी पत्नी मनीषा याची आई वडील व भाऊ यांच्याकडे राहिला आले आहेत .सोमवारी मध्य रात्री सागर याने झोपेत असलेल्या पत्नी मनीषा च्या. डोक्यात हातोड्याची घाव घातले अचानक झालेले हल्ल्यामुळे मनीषाही किचळत उठली त्यामुळे घरातील इतर सदस्य जागे झाले. आणि एकच गोंधळ उडाला दरम्यान शेजारील नागरिकांनी सागर याला पकडून ठेवले आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवले, ग्रामपंचायतीच्या रुग्नवाहिकेतून जखमी मनीषाला कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात पाठवून पोलिसांनी सागरला ताब्यात घेतले.
पण त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केली त्यावेळी पोलिसांनी त्याला अटक न करता 108 क्रमांकाची रुग्णवाहिका मागून घेऊन त्यालाही सीपीआर मध्ये दाखल केले सागर पहाटेपर्यंत रुग्णालयात थांबला आणि नंतर तेथून पळून गेला, तो बावडामार्गे शिये पंचगगेच्या पुलावर आला आणि त्यांनी नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पाहिल्याची समजते त्यामुळे सागरने आत्महत्या केली असाही संशय व्यक्त होत आहे. अद्याप त्याचा शोध लागला नाही. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे
0 Comments