Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

किसन वीर मध्ये ‘सेल्फी विथ टीचर्स’ने शिक्षक दिन संपन्न.राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.

 किसन वीर मध्ये ‘सेल्फी विथ टीचर्स’ने शिक्षक दिन संपन्न.राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा उपक्रम.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई : दि. ०५ सप्टेंबर

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीदिनाचे ओैचित्य साधून, येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी ‘सेल्फी विथ टीचर्स’ अंतर्गत महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना फूल देऊन शिक्षक दिन साजरा केले. 

०५ सप्टेंबर हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा जयंतीसोहळा सर्वत्र शिक्षक दिन म्हणून साजरा केले जातो. प्रत्येकजण वेगवेगळ्या पध्दतीने शिक्षक दिन साजरा करीत असतो. किसन वीर च्या एन.एस.एस. विभागाने हा जयंती सोहळा साजरा करताना महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना त्यांच्या विभागात जाऊन त्यांना फूल देऊन शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, भीमराव पटकुरे यांचा सन्मान करून, एन. एस. एस.च्या स्वयंसेवकांनी महाविद्यालय प्रांगणातील प्रत्येक शिक्षकाला नमस्कार करून त्यांचा सन्मान केला. त्यासाठी महाविद्यालायाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांचे खंबीर पाठबळ मिळाले. प्रकल्प अधिकारी  डॉ. संग्राम थोरात व डॉ. अंबादास सकट यांनी त्याचे नेटके नियोजन केले.

याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी म्हणाले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. त्यांनी आपला जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा व्हावा अशी इच्छा व्यक्त केली व त्यानुसार आपण शिक्षक दिन साजरा करीत असतो. आपला विध्यार्थी मोठा होऊन त्याने नावलौकिक मिळवावा अशी प्रत्येक शिक्षकाची इच्छा असते, असे सांगून त्यांनी स्वयंसेवकांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणासाठी केलेला संघर्ष त्यांच्यासाठी प्रेरणादायी असल्याचा मानस सर्व सहभागी स्वयंसेवकांनी बोलून दाखविला. 

  सदर उपक्रमात विजया जगताप , सायली वरे , साक्षी नरुटे, सुमित भणगे यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास एन. एस. एस.चे स्वयंसेवक व स्वयंसेविकांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments