भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात: अभिषेक सावेकर

 भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवितात: अभिषेक सावेकर

--------------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई :

ग्रामीण भागातील विद्यार्थी हे अतिशय हुशार असतात, परंतु मुलाखतीवेळी केवळ मुलाखत तंत्र अवगत नसल्यामुळे ज्ञान असूनही त्यांची निवड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी मुलाखतीसाठी जाण्याअगोदर तयारी केली पाहिजे.विविध भाषिक कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे प्रतिपादन मॅजिक बस इंडिया फौंडेशनचे प्रशिक्षक श्री.अभिषेक सावेकर यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागामार्फत आयोजित १० दिवसीय रोजगारक्षमता कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्धघाटनाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी  विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ.हणमंत कणसे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) डी. एन. झांबरे, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली पाटील यांची उपस्थिती होती.

सावेकर पुढे म्हणाले, या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीसाठी लागणारी सर्व कौशल्ये; यामध्ये बायोडाटा, मुलाखत तंत्र, संभाषण कौशल्य, कलचाचणी या सर्व गोष्टीची तयारी करून घेतली जाणार आहे तसेच या सर्टिफिकेट कोर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत असे त्यांनी आश्वासित केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले, विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून आपला आत्मविश्वास प्रबळ केला पाहिजे. या कार्यशाळेत अनेक कौशल्ये आपल्यामध्ये विकसित केली जातील तसेच या माध्यमातून जो बदल विद्यार्थ्यांमध्ये होईल त्याचा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरसाठी होणार आहे. कंपनीला आवश्यक असणाऱ्या सर्व कौशल्यांचे ज्ञान आणि उपयोजन हे या प्रशिक्षण कार्यशाळेत दिले जाणार आहे.

प्रास्ताविकामधे प्रा.(डॉ.) झांबरे यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करीत नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा कशी उपयुक्त आहे हे सांगितले.

पाहुण्यांचा परिचय रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ संदीप वाटेगावकर यांनी करून दिला. अक्षदा संकपाळ व ऋतुजा भोईटे यांनी सूत्रसंचालन केले.  सोमनाथ सानप यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी  राजेश्वरी कामटे, मंजिरी पिसाळ, प्रियांका जाधव, निकिता सुर्वे, अजित पांढरे, धनश्री शिर्के तसेच भास्कर घोणे, अनिल सावंत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, दत्ता काळे चेतन तावरे,  किशोर पिसाळ, शुभम पिसाळ यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.