स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे गांधी व शास्त्री जयंती उत्साहात साजरी


. स्व माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे गांधी व शास्त्री जयंती उत्साहात साजरी.



.. रिसोड प्रतिनिधी रणजीत सिंह ठाकुर 


गांधी जयंती दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते आणि महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि तत्त्वांचा सन्मान केला जातो त्यांचा जन्मदिवस म्हणून देशात आणि जगभरात हा दिवस साजरा केला जातो. ब्रिटिशांच्या राजवटीविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या प्रसिद्ध नेत्यांपैकी एक म्हणून ते ओळखले जातात. त्यांना 'महात्मा गांधी म्हणून संबोधले जाते. लोक प्रेमाने त्यांना 'बापू' असेही म्हणतात. तसेच गांधीजींना 'राष्ट्रपिता' मानले जाते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.श्री. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशमधील वाराणसीपासून सात मैल दूर मुघलसराई या लहान रेल्वे गावात झाला. लाल बहादूर शास्त्री केवळ दीड वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. विशीतील त्यांची आई आपल्याड तीन मुलांसह वडिलांच्या घरी स्थायिक झाली. लहान गावात लालबहादूर यांचे शालेय शिक्षण यथातथाच झाले. मात्र तरीही गरीबीतही त्यांचे बालपण काही प्रमाणात सुखात गेले. उच्च माध्यमिक शाळेत शिकता यावे, यासाठी त्यांना वाराणसीमध्ये काकांच्या घरी पाठवण्यात आले. घरी सर्वजण त्यांना "नन्हे " नावाने हाक मारीत. ते कित्येक मैल अनवाणी चालत शाळेला जायचे. कडक उन्हाळयातही तापलेल्या रस्त्यावरुन ते शाळेत जायचे. वयात आल्यावर, लाल बहादूर शास्त्री यांना परकीयांच्या गुलामीमधून देशाला मुक्त करण्याच्या लढयात रुची निर्माण झाली. भारतात ब्रिटीश राजवटीला पाठिंबा देणाऱ्या भारतीय राजांची महात्मा गांधी यांनी केलेल्या निंदेमुळे ते अत्यंत प्रभावित झाले. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री केवळ अकरा वर्षांचे होते, आणि तेव्हापासून राष्ट्रीय स्तरावर काहीतरी करण्याबाबतची प्रक्रिया त्यांच्या मनात घोळू लागली. गांधीजींनी देशवासियांना असहकार चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले, त्यावेळी लाल बहादूर शास्त्री सोळा वर्षांचे होते. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गांधीजी व शास्त्री जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलंन व हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना शाळेतील वर्ग 5 वी च्या विद्यार्थ्यांनी केले. यासोबतच विध्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी व शास्त्री जी यांची वेशभूषा करून नाट्य सादरीकरण व नृत्य करण्यात आले तसेच रोल प्ले चे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थी व शिक्षकांची समायोचित भाषणे संपन्न झाली. या सर्वांनी गांधीजीच्या व शास्त्रीजींच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे कार्य सांगितले. यावेळी शाळेचे संचालक मंडळ, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.