किसन वीर महाविद्यालयात थोर उद्दोजक रतन टाटा यांना श्रध्दांजली.

 किसन वीर महाविद्यालयात थोर उद्दोजक रतन टाटा यांना श्रध्दांजली.

------------------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

------------------------------------------

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने भारत व जगभरातील थोर उद्योजक, महाराष्ट्राचे उद्योगरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण  रतन टाटा यांच्या तसेच महाविद्यालयात इ. अकरावी मध्ये शिकणारी कु. आर्या मुकेश पोळ यांच्या दुःखद निधनाबद्दल शोकसभेचे आयोजन केले व त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांच्या हस्ते स्व. रतन टाटा यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर शोकसभेत डॉ. गुरूनाथ फगरे यांनी 'रतन टाटा यांचे उद्योग, सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य' या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, डॉ. हणमंत कणसे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, श्री. भिमराव पटकुरे, डॉ. शिवाजी कांबळे, श्री. बाळासाहेब कोकरे, श्री. अर्जुन जाधव, श्री. बाळासाहेब टेमकर यांची विशेष उपस्थिती होती. 

डॉ. गुरूनाथ फगरे म्हणाले की, रतन टाटा यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी होती. जगभरातील उद्योग क्षेत्रातील अग्रगण्य नाव म्हणजे रतन टाटा. 'टाटा समुह म्हणजे विश्वास',  रतन टाटा म्हणजे सर्वसामान्यांचे उद्योगपती. नैतिकतेचा परिपाठ म्हणजे रतन टाटा. रतन टाटांनी 'टाटा' नावाचा ब्रँड सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण केला. रतन टाटा यांच्याबद्दल भारतीय जनमानसात आदराची भावना आहे. त्यांनी पैशापेक्षा तत्त्व, माणुसकी व देशाभिमान जपला. रतन टाटा यांनी संकट काळात देशाला नेहमीच मदत केली. टाटा समूहाने उद्योग क्षेत्रात भारतास उंच पातळीवर नेले. रतन टाटा यांनी सर्वसामान्य जनता, मजूर व कामगारांचा नेहमीच आदर व सन्मान ठेवला. कोरोना काळात  त्यांनी सरकार व सर्वसामान्य जनतेस सढळ हातानी मदत केली. मुंबईत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलची' उभारणी केली. रतन टाटा यांचे धाडशी निर्णय  व अथक परिश्रमामुळेच टाटा समूहाने स्वयंपाक घरात आवश्यक असणारे मीठ ते अवकाशातून प्रवास करण्यासाठी आवश्यक असणारे विमान आदी क्षेत्रात नावलौकीक मिळवला. टाटा समूहाने सर्वसामान्य कुटुंबाचे कार घेण्याचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी 'टाटा न्यानो' कारची निर्मिती केली. आजही देशातील ताज हॉटेलच्या सर्व शाखांमध्ये भारतीय सैनिकांना सन्मानपूर्वक व मोफत सेवा दिली जाते. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशाचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच महाविद्यालयात इयत्ता अकरावीत शिकणारी कु. आर्या मुकेश पोळ हिच्या दुःखद निधनामुळे तिच्या कुटुंबीयांनवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. यातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळो या ईश्वरचरणी प्रार्थनेसह शोकसभा संपन्न झाली. स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी सदर शोकसभेचे आयोजन व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.