नेज शिवपुरी येथे पाच वर्षात सव्वा दोन कोटीची विकास कामे आमदार राजू बाबा आवळे.

 नेज शिवपुरी येथे पाच वर्षात सव्वा दोन कोटीची विकास कामे आमदार राजू बाबा आवळे.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

नेज-शिवपुरी गावच्‍या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षात सुमारे सव्‍वादोन कोटींची विकासकामे केली आहेत,असे मत आमदार राजु आवळे यांनी व्‍यक्‍त केले.नेज येथे त्‍यांच्‍या फंडातून मंजूर विविध विकासकामांच्‍या उदघाटन प्रसंगी बोलत होते.माजी पंचायत समिती सदस्‍य बी.जे.पाटील अध्‍यक्षस्‍थानी होते.माजी सरपंच सुनिल देशमुख,जावेद मुल्‍ला,तोफिक शिकलगार यांनी मनोगत व्‍यक्‍त केले.आमदार श्री.आवळे यांचा सत्‍कार झाला.आमदार राजू आवळे साहेब यांच्या हस्‍ते वाढीव गावठाण वसाहत येथे रस्ता काॅंक्रीटीकरण कामाचा,मुस्लिम समाज कब्रस्तान सभोवती संरक्षण भिंत बांधणे कामाचा,धनगर समाज मंदिर परिसर पिव्हिंग ब्लॉक बसविणे कामाचे,जि.प.विद्यामंदिर नेज शाळा सभोवती संरक्षण भिंत बांधणे कामांचा शुभारंभ करण्‍यात आला.माजी सरपंच रविंद्र खोत,बाळासो चव्‍हाण,रमेश घाटगे,युनुस मुल्‍ला,नजीर गवंडी,ग्रामसेविका स्‍वाती शेळके,राॅबट घाटगे उपस्‍थीत होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.