कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवानी जपला बंधुभाव नवरात्रात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भविकांना व बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीसांना मुस्लिम बांधवांच्या वतीने पाणी वाटप
कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवानी जपला बंधुभाव
नवरात्रात अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भविकांना व बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीसांना मुस्लिम बांधवांच्या वतीने पाणी वाटप .
कोल्हापूरच्या हिंदू मुस्लिम बांधवांचा जातीय सलोखा जगजाहीर आहे.. जाती पातीच्या भिंती तोडून कोल्हापूरच्या हिंदू मुस्लिम बांधवानी परस्पर स्नेह आणि बंधू भाव नेहमीच जपला आहे. याचीच प्रचिती आज आली.
हिंदू बांधवांचा नवरात्र उत्सव सध्या सुरु आहे. नवरात्र उत्सवादरम्यान अंबाबाई देवीच्या मोठ्या प्रमाणात देशभरातून भाविक येतात. वाढलेला उन्हाचा तडाखा आणि ऑक्टोबर हिट मुळे उकाड्यात झालेली वाढ यामुळे अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना लागणारी तहान याचा विचार करून कोल्हापूरच्या मुस्लिम बांधवानी भवानी मंडप परिसरातील भवानी मंदिर, अंबाबाई मंदिर दर्शन रांग आणि मंदिराच्या चारीही दरवाजाच्या परिसरात भावीकांना थंड आणि शुद्ध पाण्याच्या बाटल्याचे वाटप केले. युवा नेते रियाज सुभेदार, वसीम चाबुकस्वार, अख्तर इनामदार, मुजीब महात, शाहरुख बारगीर, पप्पू शेख, ताहीर मुजावर, युनूस नदाफ, अर्षद इनामदार, सलीम मुल्ला यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. फ्रंटलाईन महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नवाब शेख, कोल्हापूर
Comments
Post a Comment