पक्षाकडून उमेदवारी मिळणारच पण नाही मिळाल्यास निवडणूक लढवणारच -मा. आमदार सुजित मिणचेकर.

 पक्षाकडून  उमेदवारी मिळणारच पण नाही मिळाल्यास निवडणूक लढवणारच -मा. आमदार सुजित मिणचेकर.

------------------------------ 

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

------------------------------ 

पक्षप्रमुखांनी आदेश दिल्यास कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले विधानसभा लढवणारच असे जाहीर प्रकटन आज हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार डॉक्टर सुजित मिंणचेकर यांनी वडगाव येथे झालेल्या संवाद मिळावे व्यक्त केले. पक्षप्रमुख आपल्याला उमेदवारी देणार या विषयावर आपण ठाम असून यावेळी निवडणूक आपण जिंकणारच असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. परिणामी राज्य लेव्हलला काय होतंय या राजकारणाशी आम्हाला देणे घेणे नसून आम्ही पक्ष श्रेष्ठींशी व पक्षाशी एकनिष्ठ आहोत व त्या एकनिष्ठ पणाचे फळ नक्कीच शिवसेना मला उमेदवारी देऊन देणार.



     आमचा विश्वास महाविकास आघाडी वरती नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वरती आहे. हातकणंगले विधानसभेची जागा ही शिवसेनेला सोडण्यासाठी सर्वच पक्षप्रमुख प्रयत्नशील असून येणाऱ्या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही जागा शिवसेनेला जाहीर करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.. जागा जरी नाही मिळाली तरी मी निवडणूक लढणारच डॉक्टर सुजित मिंणचेकर  यांचे  आवाहन .



       जर सांगलीची लोकसभा  विरोधात जाऊन लढवु शकतो तर हातकणल्याची का नाही. शिवसैनिक व मतदारांच्या पाठबळावर मी ही निवडणूक लढवणार असून त्यामध्ये माझा विजय निश्चित आहे.. मग येणाऱ्या निवडणुकीत सोशल मीडियाची महत्त्वाची भूमिका असून सोशल मीडिया आमच्या पाठीशी ठामपणे राहील. असा विश्वास यावेळी माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांनी बोलताना व्यक्त केला.

    यावेळी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रवीण यादव ,ठाकरे गटाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, बी एल शिंगे,संदिप दबडे,महाविर कांबळे, तसेच  परिसरातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.