एकलासपूर येथील शेकडो युवक,ज्येष्ठांचा ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप मधे प्रवेश - भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ कायम
एकलासपूर येथील शेकडो युवक,ज्येष्ठांचा ॲड.नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात भाजप मधे प्रवेश
-भाजपमध्ये प्रवेशाचा ओघ कायम
--------------------------------------
रिसोड - रिसोड प्रतिनिधी.
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------------
तालुक्यातील एकलासपूर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्या नेतृत्वात व माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याव विकासक्षम धोरणावर विश्वास ठेवून आणि मागील दीड वर्षात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला आणि गुणवत्ता पूर्ण कामे केली.त्यामुळे रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघात गावगाडा,वाडी वस्त्यावरील कायम दुर्लक्षित असलेल्या समस्या या विकास निधी मुळे मार्गी लागल्या.त्यामुळे आम्ही भाजप नेते ॲड नकुल देशमुख यांच्या विकासक्षम धोरण हे येणाऱ्या काळात विकासापासून कोसो दूर असलेल्या रिसोड मालेगाव मतदार संघाला विकासाच्या मार्गावर अनु शकते त्यामुळे आम्ही भाजप मधे प्रवेश करीत आहोत असे प्रवेश कर्त्यानी प्रतिक्रिया दिल्या. यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख,जिल्हा अध्यक्ष शाम बढे,भाजप रिसोड मालेगाव विधानसभा निवडणुक प्रमुख ॲड नकुल देशमुख यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सखाराम सोनुने, अमर सोनुने, एकनाथ कुलाळ, गजानन डहाळके, रवींद्र सोनुने, बद्री सोनुने, गजानन सोनुने,भागवत सोनुने, हनुमान खंडागळे, भागवत खंडागळे, जगन डहाळके, अश्रू डहाळके, महमूद सय्यद, अब्रार सय्यद, राजू भाई टेलर, नजम पटेल, दत्ता डहाळके, निंबाजी डहाळके, भगवान डहाळके, महादेव डहाळके, संदीप डहाळके सहित शेकडो युवक व ज्येष्ठ ने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी कार्यक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष वाशिम,भाजपा जिल्हा महामंत्री गजाननराव लाटे, भाजी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष मनोज अनसिंगकर, तालुका सरचिटणीस भाजपा भूषण पाटील, पंचायत राज संयोजक ॲड.गजानन देशमुख,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विनोद वाळके, वाकद येथील सरपंच अमोल देशमुख, सुनील लाटे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख, प्रकाशराव हरीमकर,गजानन पैठणकर, गोहोगाव हाडे सरपंच विकास हाडे,संदीप गवळी, राजू हाडे,अशोक हाडे, गोविंद पाटील वाळके, कंकरवाडी येथील माजी सरपंच बबनराव कांबळे, दतराव देवकर, मदन देवकर, मदन देवकर, विठ्ठल देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख, मोरगव्हाण सरपंच शेषराव कोकाटे, अशोकराव कुलाळ, भाजपा डॉक्टर सेल तालुका संयोजक डॉक्टर गोविंद कुलाळ, सदानंद कुलाळ, अभिमान कुलाळ, प्रल्हादराव मुळे, तानाजी डहाळके, विलास कुलाळ, संतोष डहाळके, राहुल आल्हाट, राजू अंभोरे, उत्तम मोरे, प्रवीण सोनुने, विष्णू डहाळके,अश्रू कुलाळ यांच्यासहित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख कार्यकर्ते व गावकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Comments
Post a Comment