कण्हेर जलाशय उपसा पंप शेतकरी संघटना जावली यांच्या वतीने प्रमुख मागण्या साठी तहसीलदार कार्यालया समोर उपोषण.
कण्हेर जलाशय उपसा पंप शेतकरी संघटना जावली यांच्या वतीने प्रमुख मागण्या साठी तहसीलदार कार्यालया समोर उपोषण.
---------------------------------
जावली प्रतिनिधी
शेखर जाधव
---------------------------------
त्वरीत मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करणार उपसा पंप शेतकरी संघटना जावली
/भणंग :- जावली/मेढा. आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला शेतकऱ्याबद्दल चर्चा आनंदाची बातमी ऐकली आम्हाला फार आनंद झाला. पण ज्यावेळीस वीज पंपाचे बिल ७.५ एचपीच्या आतील सर्व शेतकण्याचे सर्व बिल माफ केलेत तौ सुद्धा अतिशय चांगला निर्णय होता पण आमच्या कन्हेर धरण जि. सातारा येथील आमच्या भागच्या शेतकऱ्याच्या ८०% टक्के मोटरी १० एच पी ते २० एच पी च्या आहेत. तसा आम्हाला पाणी परवाना मिळाला आहे पण कण्हेर धरणाचा संपूर्ण भाग डॉगैरी असल्यामुळे आमच्या जमीनी डोंगर कपारीत असलेमुळे कमीत कमी ६० मीटर ते ८५ मीटरचे हेड असल्यामुळे आम्हाला १०. एच. पी ते २० एच पी चे परवाने मिळाले. ज्यावेळी कण्हेर धरण प्रकल्पात आमच्या जमीनी गेल्या मुळे सर्व जमीन डोंगर कपरी असल्यामुळे आमचे बारमाही परवाने नाहीत किंवा आमचे असणारे ३० टक्के क्षेत्र बागायत आहे. जी पिके करतो ती जंगली प्राणांमुळे व पक्षांमुळे शेतीचे जास्त नुकसान होते, त्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहेत. तरी या गोष्टीचा पुर्नविचार करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय दयावा ही विनंती.
तसेच वरील विषयाचा विचार करून सर्व शेतकऱ्याना न्याय मिळवा यासाठी कण्हेर जलाशय उपसा पंप शेतकरी संघटना जावलीच्या वतीने दिनांक ०८/१०/२०२४ रोजी तहसील कार्यालय मेढा येथे उपोषण करण्यात आले
कण्हेर जलशय शेतकरी पंप संघटना जावली तालुका.कण्हेर जलाशय उपसापंप शेतकरी संघटना जावली,यांच्या वतीने मेढा तहसीलदार यांना निवेदन देउन तहसीलदार कार्यालयाच्या गेटसमोर बसुन उपोषण करण्यात आले.
त्यावेळी शेतकऱ्यांच्य प्रमुख मागण्या कण्हेर जलाशयावरील सर्व विद्युत पंपधारक शेतकऱ्यांची सरसकट पाणी पट्टी व विजबीले माफ व्हावी तेही अचार सहिता लागण्यापूर्वी,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. मा, मुख्यमंत्री. एकनाथजी शिंदे.
मा,मुख्यमंत्री साहेब आपणही एका सामान्य शेतकऱ्याचे सुपुत्र अहात,तर जसी7/50,hp.पर्यंत विज बिले शेतकरी बांधवांची माफ केलत तसीच 20 hp पर्यंत सर्व शेतकरी बांधवांची विजबीले माफ व्हावी हि सर्व शेतकरी बांधवांची कळकळीची विनंती.या वेळी पचंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय जवान जय किसान. जय महाराष्ट्र.
Comments
Post a Comment