बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगरची विद्यार्थीन सरस्वती धबडघाव राज्यस्तरावर.
बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगरची विद्यार्थीन सरस्वती धबडघाव राज्यस्तरावर.
------------------------------
रिसोड प्रतिनिधी
रणजीत सिंह ठाकुर
------------------------------
महाराष्ट्र राज्य संचालनालय पुणे तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या तर्फ घेण्यात आलेल्या विभागस्तरीय शालेय मैदानी क्रिडा रिसोड तालुक्यातील बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर ता रिसोड ची विद्यार्थीनी सरस्वती बालाजी धबडघाव थाळीफेक प्रकारात १९ वयोगटात वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक प्राप्त करून राज्यस्तरावर झेप घेतली आहे.
नेहरू क्रीडा संकुल, बुलढाणा येथे विभागस्तरीय मैदानी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा येथे १९ वर्ष वयोगटातील स्पर्धेचे 25 ऑक्टोबर १९ वर्ष वयोगटात कु. लक्ष्मी धबडघाव ही थाळीफेक प्रकारात द्वितीय क्रमांक (सिल्व्हर) घेऊन विभागीय स्पर्धेत द्वातीय क्रमांक मिळवून राज्यस्पर्धेकरिता पात्र ठरली आहे याबद्दल सरस्वती बालाजी धबडघाव हिचे खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. हिच्या विजयासाठी सोनाजी इंगळे यांनी मेहनत घेतली असून विजयाचे श्रेय प्राचार्य तथा शारीरिक शिक्षक कै. ज. साबळे, प्राचार्य प्रदीप गवळी, रा मु पगार, सोनाजी इंगळे, सोपान कोरडे, बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जाते. यांच्या यशाने केशवनगर रिसोड तालुका तसेच वाशिम जिल्ह्या परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment