मानवाच्या अस्तित्वासाठी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज :: वनपाल विश्वास पाटील यांचे प्रतिपादन वन्यजीव सप्ताह निमित्त म्हासुर्ली येथे पारितोषिक वितरण समारंभ.

 मानवाच्या अस्तित्वासाठी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन काळाची गरज  :: वनपाल विश्वास पाटील यांचे प्रतिपादन वन्यजीव सप्ताह निमित्त म्हासुर्ली येथे पारितोषिक वितरण समारंभ.

------------------------------------- 

कौलव वार्ताहर

 संदीप कलिकते

------------------------------------- 

              मानव आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी निसर्गाची हानी करत चालला असल्याने निसर्गातील अन्नसाखळीत नष्ट होत आहे परिणामी अन्नसाखळीच नष्ट झाल्यास मानवच नष्ट होईल म्हणून मानवाने आपल्या अस्तित्वासाठी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हासुर्ली परिमंडळाचे वनपाल विश्वास पाटील यांनी केले.

                वनपरिक्षेत्र राधानगरी परिमंडळ म्हासुर्ली व म्हासुर्ली हायस्कूल म्हासुर्ली ता राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित निबंध लेखन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बी आय दुरुगडे होते प्रमुख पाहुणे म्हणून वनरक्षक ईश्वरा जाधव ,उमा जाधव, उत्तम भिसे, वनसेवक जैनुल जमादार, जोतिराम कवडे, बळवंत डवर, संजय पानारी प्रमुख उपस्थित होते. 

                    स्वागत हरित सेना प्रमुख डी.डी कलिकते यांनी केले स्वर्गीय गोविंदरावजी दूध संस्थेचे चेअरमन मधुकर किरुळकर यांनी प्रास्ताविक केले .मानवनिर्मित वनव्यामुळे निसर्गाची अपरिमित हानी होत चालली असल्याने जंगलातील वन्यजीवांचा ऱ्हास होत चालला आहे त्यामुळे जंगलातील पशु,पक्षी व प्राणी यांचा गाव वस्तीमध्ये वावर वाढला आहे हा वावर रोखण्यासाठी मानवानेच जंगलास वणवा लावणे थांबविले पाहिजे असे मत सामाजिक वनीकरणाचे जीवन कुमार कांबळे यांनी व्यक्त केले .

                       यावेळी निबंध लेखन स्पर्धेतील विजेते क्रांती जोगम, रिया  भित्तम ,आदिती सुतार, स्नेहा बाचनकर, कार्तिकी मगदूम, वैष्णवी परीट व प्रणव कांबळे यांचा पाहुण्यांच्या हस्ते शालेय भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .औदुंबर पाटील एस एस पोवार, रामदास वडाम ,किरण कवडे ,शारदा कांबळे मनीषा पाटील यांनी मनोगत केली .

यावेळी बी..जी खराडे कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली छात्र अध्यापक रामदास वडाम यांच्या हस्ते 200 सिडबॉलचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले त्यामुळे रामदास वडाप यांचे वनपाल विश्वास पाटील यांनी कौतुक केले मारुती पाटील शरद कांबळे वसंत गुरव संजय रेडेकर संगणक तज्ञ सचिन लाड सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी आनंदा चौगुले रेस्क्यू टीमचे कृष्णात गुरव शैलेश पाटील शालेय मंत्रिमंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मधुकर किरूळकर यांनी सूत्रसंचालन केले व्हीएस लाड यांनी आभ

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.