हातकणंगले तालुक्यात गुन्हेगारी व सावकारकीचे साम्राज्य वाढले .

 हातकणंगले तालुक्यात गुन्हेगारी व सावकारकीचे साम्राज्य वाढले

 









------------------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे)

-----------------------------------------------

  वर्चस्व वादावरून झालेला खून, विनापरवाना असणारे लाजिग व्यवसाय त्यामध्ये अल्पवयीन मुलींच्या वर होणारे बलात्कार, पोक्सो कायदे अंतर्गत होणारे गुन्हे, कुंभोज सह परिसरात बाजारपेठेत होणारे मोबाईल चोरी, खाजगी सावकारी व त्याच्या तागाद्या त्याच्या तागाद्यातून होणारे ग्रामीण भागातील युवक युवतींच्या आत्महत्या, चोरीची प्रकरणे, अनेक ठिकाणी राजकारणातून होणारे वाद, कॉलेज परिसरात असणारी दहशत दारू व मटका व्यवसायिकांचा असणारा दबदबा, अनेक ठिकाणी खुल्याम केली जाणारी गांजाची विक्री, हातकणंगले तालुक्यातील अनेक गावांची वाटचाल ही गुन्हेगारीकडे होत असल्याचे दिसत आहे सहजासहजी मिळत असलेला मुबलक पैसा, खुले आमपणे सुरू असलेले अवैध्य व्यवसाय व पोलिसांची अकार्यक्षमता यामुळे काही दिवसापासून  हातकणंगले तालुक्याची वाटचाल गुन्हेगारीकडे होत असल्याचे दिसत आहे

हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक विकास जस जसा वाढत चालला आहे त्याच गतीने गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत चालले आहे हातकणंगलेचा चारही बाजुंनी   औद्योगीकरण झाले आहे.या ठिकाणी स्थानिक कामगाराबरोबरच परप्रांतीय कामगार ही मोठ्या प्रमाणावर काम करतात तरीही कामगारांचा तुटवडा भासत आहे. यातूनच कारखानदारांना  कामगार पुरवण्याचा ठेका  मिळवण्यासाठी चाललेली रसिखेच  यातून  निर्माण होणारी वर्चस्व वादाची लढाई  होत असते. याचेच रूपांतर कालांतराने गुन्हेगारी मध्ये होत चालले आहे. यातूनच अनेकांना धमक्या देणे दबाव तंत्राचा वापर करणे उद्योजकाला भीती घालणे  यासारखे प्रकार घडत आहेत मात्र याची वाचता कुठे केली जात नाही,

        यामुळे  गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची चर्चा  नेहमीच चर्चा असते यातून मिळणारा मुबलक पैसा याकडे अल्पवयीन युवक तसेच तरुण वर्ग आकर्षित होत आहे व गुन्हेगारी मध्ये वाढ होत आहे. याचबरोबर खुलेआमपणे सुरू असलेला अवैध्य व्यवसाय यात प्रामुख्याने गुटका , मटका दारू अड्डे नशेचे  पदार्थ विक्री , गांजा , बाँण्ड यासारखे वैद्य धंदे  सुरू आहेत याकडेही अनेक तरुण वर्ग आकर्षित होतो या नशेच्या भरातच अनेकांनी गंभीर गुन्हेही केल्याची घटना हातकणंगले तालुक्यात कित्येकदा घडल्या  आहेत. तसेच परप्रांतीय कामगारांच्या वचक ठेवण्यासाठी होणारी दमदाटी वाटमारी  हे नित्याचे झाले आहे एकेकाळी हातकणंगले तालुक्यातील असलेला  समृद्धीचा वारसा या गुन्हेगारी  प्रवृत्तीने नष्ट होत असल्याचे दिसत आहे 

चौकट

राजकीय स्वार्थासाठी तरुणांचा वापर

हातकणंगले तालुक्यात अनेक स्वयंभू नेते  आपल्या राजकीय स्वार्थासाठी तरुणांचा वापर करत असल्याचे दिसत आहे या तरुणांना योग्य मार्गदर्शन न देता त्यांना गुन्हेगारी धडे देत आहेत .या तरुणांना सहजासहजी मिळणारा मुबलक पैशाचे आम्ीष दाखवून तसेच  चैनीच्या वस्तू व नशेचे पदार्थ पुरवून त्यांचा आपल्या स्वार्थासाठी  वापर करत असल्याचे दिसत आहे .  यात अनेक अल्पवयीन मुलांचा देखील समावेश केला जातो राजकीय नेते भाई , दादा , युवा नेते ,अशा पदव्या चा या तरुणांना देत  भुरळ पाडत आहेत यातून गुन्हेगारी वाढत चाली आहे

 

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.