कुंभोज बिरदेव मंदिरास ब वर्गाचा दर्जा परिपत्रक मिळाले सचीन पुजारी.
कुंभोज बिरदेव मंदिरास ब वर्गाचा दर्जा परिपत्रक मिळाले सचीन पुजारी.
------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------
श्री हिरखान बिरदेव मंदिर, कुंभोज हे देवालय "ब"वर्ग मध्ये समाविष्ट करण्यात आले. तसे परिपत्रक आपणास उपलब्ध झाले. असल्याची माहिती धनगर समाजाचे युवा नेते सचिन पुजारी यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धनगर समाजाचे अध्यक्ष माजी सरपंच कोंडीबा भानुसे होते.
यावेळी बोलताना सचिन पुजारी म्हणाले की बरीच वर्षे झाली हिवरखान बिरदेव मंदिर ब वर्ग सूची मध्ये समाविष्ट करण्यासाठी सामाजिक स्तरावरून भरपूर प्रयत्न होत होता, तरी या कामासाठी ग्रामपंचायत कुंभोज, सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक, तलाठी,कुंभोज. यांनी वेळोवेळी पाठपुरावा घेऊन, आम्हाला लागणारी सर्व कागदपत्रे वेळेत उपलब्ध करून दिल्यामुळे हे काम वेळेत पूर्ण झाले,त्याबद्दल तसेच कुंभोज मधील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल या सर्वांचेच मनापासून आभार मानले.
विशेष करून या कामासाठी ज्या ज्या ठिकाणी अडचणी जाणवतील त्या त्या ठिकाणी वेळोवेळी मोलाचा सल्ला आणि सहकार्य केले बद्दल माजी गृहराज्यमंत्री व विद्यमान आमदार.सतेज उर्फ बंटी पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचे समस्त धनगर समाजाच्या वतीने खूप खूप आभार.
तसेच विद्यमान आमदार राजू बाबा आवळे तसेच माजी खासदार राजू शेट्टी, खासदार धैरशील माने व सौरभ शेट्टी ,अजित फराकटे मोहन सालपे धनाजी गोडसे दगडू भोसले ,सागर पुजारी यांचेही वेळोवेळी आम्हाला सहकार्य लाभले सल्ला मिळाला त्याबद्दल त्यांचेही समस्त धनगर समाजाच्या आभार मानले.
हिवरखान बिरदेव मंदिर कुंभोज हे देवालय ब वर्ग सूची मध्ये गेल्यामुळे देवालयाची तर भरपूर सुधारणा होणारच आहे पण याचा आपल्या गावासाठी व पंचक्रोशीतील भाविकांसाठी चांगल्या प्रकारे कसा उपयोग करता येईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहण्याचे आव्हान कोंडीबा भानुसे यांनी केले.
यावेळी धनगर समाजाचे अध्यक्ष कोंडीबा भानुसे उपाध्यक्ष मंगू पुजारी ,सचिन पुजारी,दादासो गावडे, पांडू भानुसे, अमोल गावडे, बिरदेव तानगे ,सुरेश तानगे, अरुण पुजारी, प्रवीण भानुसे ,उदय बनणे ,अभि भानुसे ,सतीश कवठेकर ,संदीप भानुसे ,भानुसे अमर, धनंजय पालखे, सचिन भानुसे, सुरेश भानुसे,सागर पुजारी,अमर पुजारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment