डॉक्टर राहुल आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित.

 डॉक्टर राहुल आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित.

-----------------------------------

कुंभोज प्रतिनिधी 

विनोद शिंगे

-----------------------------------

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आयोजित भव्य नामांकन रॅलीमध्ये भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह आणि इचलकरंजीवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता इचलकरंजी विधानसभेमध्ये विजयाचा गुलाल भाजपाच उधळणार, पुन्हा एकदा कमळ फुलणार हा विश्वास अधिक दृढ झाला आहे.*



*आज महायुतीचे अधिकृत उमेदवार मा. श्री. राहुल प्रकाश आवाडे  यांनी प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे भाजपा विधानसभेच्या निरीक्षक आमदार सौ. शशिकला जोल्ले, आमदार मा.श्री. प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी सौ. मोसमी चौगुले यांच्या कडे दाखल केले.*


यावेळी खासदार मा.श्री. धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, आवाडे कुटुंबातील सदस्य, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष (पुर्व) राजवर्धन नाईक निंबाळकर, अनिल डाळ्या, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, ताराराणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पाटील, शहराध्यक्ष पै.श्री.अमृतमामा भोसले, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, मा. जि. प. सदस्य अशोकराव माने, मा. जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, संजय केंगार, सौ. विजया पाटील, आर पी आय चे शहराध्यक्ष श्रीनिवास कांबळे,  मोहन मालवणकर, महिला अध्यक्षा सौ. अश्विनी कुबडगे, ताराराणी महिला अध्यक्षा उर्मिला गायकवाड यांच्यासह नगरसेवक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते, व सर्व युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.