महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाच्या अमरावती जिल्हा प्रमुखावर गोळीबार, पोलीस यांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव. काय घडला थरार.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षाच्या अमरावती जिल्हा प्रमुखावर गोळीबार, पोलीस यांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव. काय घडला थरार.
_____________________
फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र.
पी.एन. देशमुख
अमरावती जिल्हाप्रतिनिधी
_______________________
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे अमरावती येथे अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अल्बर्ट यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. वेळीच पोलीस असल्याने त्यांचा जीव वाचला. गोपाल अल्बर्ट हे कारमधून जात असताना त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. गोळी कारच्या काचेवर जाऊन लागली. त्यानंतर गोपाल अल्बर्ट वेगाने तेथून निघाले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस आल्यामुळे ते थोडक्यात वाचले
शिंदे गटाच्या शिवसेनेतील अंतर्गत कलहातून घटना घडल्याचे चर्चेतून सांगितले जात आहे. अमरावती जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख आर गोळीबार व काय प्रकरण घडले? गोपाल अल्बर्ट यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अमरावतीतील दोन जिल्हाप्रमुखांमध्ये वाद असून त्यातून अल्बर्ट यांच्यावर जीव घेणे हल्ला झाल्याची चर्चा होत आहे. अमरावती दर्यापूर मार्गावरील पाटील धाब्यासमोर सोमवारी मध्यरात्री ही गोळी भरायची घटना घडली. तक्रारीतील माहितीनुसार, गोपाल अल्बर्ट हे अमरावती मधील काम आटवून येनोहा कारणे दर्यापूरला जात होते. गंगापूर फाट्याजवळ काळ्या रंगाची एक स्कार्पिओ गाडी आली. त्या गाडीतून उतरलेल्या तीन चार जणांनी अल्बर्ट यांची गाडी थांबवली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर गोपा पुढे अल्बर्ट निघून गेले. ते पाटील ढाब्यापर्यंत आले. तिथे त्यांना काळ्या रंगाचे स्कार्पिओ दिसली. ते तीन-चार जण गाडी थांबवण्याचा इशारा करत होते. पण अल्बर्ट यांना एका व्यक्तीच्या हातात पिस्तूल दिसले. त्या व्यक्तीस अल्बर्ट बघत असताना एकाने गोळी झाडली. ती त्यांच्या गाडीच्या काचेवर जाऊन लागली. अरबट घाबरले व त्यांनी वेगाने गाडी दर्यापूरच्या दिशेने पडविली. गाडी चालवत असताना त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यावेळी दोन गाड्या त्यांच्या पाठलाग करत होत्या. मग त्यांनी आसेगाव टी पॉईंटवरून गाडी खल्लार शिंगणापूर मार्गावर आणली. त्यावेळी समोरून पोलीस येत होते त्यामुळे अर्बट हे थोडक्यात हल्लाखोरांच्या तावडीतून वाचले.
Comments
Post a Comment