अनेकांना प्रश्न पडलाय की ,मोहन व्हनखंडे मिरज विधानसभा मतदारसंघात चालणार का ?

 अनेकांना प्रश्न पडलाय की ,मोहन व्हनखंडे मिरज विधानसभा मतदारसंघात चालणार का ?

--------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी 

राजू कदम

--------------------------------

 खासकरून हा प्रश्न महा विकास आघाडीत मोठ्या प्रमाणात उपस्थित केला जातोय .

 तसं व्हनखंडेंच्या कॉंग्रेस प्रवेशाने  सर्वात मोठा दणका बसलाय तो भाजपला आणि कामगारमंत्री सुरेश खाडे यांना .

 व्हनखंडेंच्या कॉंग्रेस प्रवेशाने एक मात्र सिध्द झालंय की ,आता मोहन व्हनखंडे नावाचा मास्तर  निवडणुकीच्या मैदानातुन माघार घेणार नाही . 

हा मास्तर भाजपला तर धडा शिकविणारच पण प्रसंगी बंडखोरी करायलाही मागेपुढे बघणार नाही .

 व्हनखंडेनी कॉंग्रेस प्रवेश केला म्हणजे त्यांना महाविकास आघाडीचे तिकीट मिळाले असं नाही पण त्यांच्या कॉंग्रेस प्रवेशाने  सर्वत्र जोरदार खळबळ उडाल्या .

 तसं  व्हनखंडेनी कॉंग्रेस प्रवेशाच्या दिवशीच   तुम्हाला दुपारी तीन वाजता ब्रेकिंग बातमी मिळेल असं सुतोवाच केलं होतं .

 तरीही व्हनखंडेनी कॉंग्रेस प्रवेश करायला एक तर घाई केल्याच पण मोठी रिस्कसुध्दा घेतल्या असं सध्याच्या पडद्याआडच्या घडामोडीवरुन म्हणायला  बराच वाव आहे . रिस्क घेणे याचं दुसरं नांव म्हणजे मोहन व्हनखंडे आहे .  समोर असलेल्या हत्तीला व्हनखंडे नावाचा मास्तर जमीनीवर पाय रोवून जोरदार टक्कर देतोय याचंच मतदारांना कौतुक वाटतंय . त्यामुळे मोहन व्हनखंडे मिरजेत केवळ चालणारच नाही तर ते पळतीलही पण कधी ? 

तर माजी मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्यासाठी बळ एकवटलं तर  !

 गतवेळच्या आमदारकीच्या निवडणुकीत  बाळासाहेब होनमोरे यांच्या साठी माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी मिरज विधानसभा मतदारसंघात एकही जाहिर सभा घेतली नव्हती याची ब-याच लोकांनी व्हनखंडेनी कॉंग्रेस प्रवेश केल्यानंतर आठवण करून दिली .

 जयंत पाटील यांनी जाहीर सभा घेतली असती तर बाळासाहेब होनमोरे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक नव्हं तर मिरजेचे आमदार म्हणून दिसले असते .

पैसा नाही म्हणून बाळासाहेब होनमोरे यांनी मतदारसंघात लोकांच्या समोर जाण्याकडे पाठ फिरवली असं काही लोकांचं मत आहे  त्यात काही अंशी तथ्यही आहे पण त्यांच्या पेक्षा बाळासाहेब होनमोरे यांनी मोठी संधी हुकवली ती म्हणजे  अजितराव घोरपडे,राजु शेट्टी यांचा मार्ग अवलंबताना त्यांना ' एक व्होट एक नोट ' हा प्रयोग  मतदारांच्यापुढे जाऊन यशस्वीपणे राबवता आला असता . त्यांची ही पोकळी कॉंग्रेस प्रवेश करुन व्हनखंडेनी भरुन काढली इतकंच .

 सी आर सांगलीकर, सिध्दार्थ जाधव, विज्ञान माने ,तानाजी सातपुते , महादेव दबडे यांना आमदारकीचे तिकीट मिळणार नाही हे अगदी सुरवातीपासुनच स्पष्ट होतं तरीही त्यांनी  शेवटपर्यंत प्रयत्न चालवलाय हे काही कमी नाही . पण यापैकी आता कोण कोण भाजपच्या खेळीला फसतोय ? ते बघावं लागेल .

मोहन व्हनखंडेंना सध्याच्या घडीला कॉंग्रेसचे विश्वजीत कदम यांचीच फक्त साथ आहे . नुतन खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी जर त्यांना समर्थन दिलं तर मोहन व्हनखंडे गोळी सारखं आमदार म्हणून निवडून येणार हे उघड आहे . आता गोची झाल्या ती माजी मंत्री जयंत पाटील आणि कामगारमंत्री सुरेश खाडे यांची .

सांगली जिल्ह्यात कॉंग्रेस वरचढ होता कामा नये म्हणून त्यांनी ' करेक्ट कार्यक्रम ' नांवाचं पिल्लू सांगली जिल्ह्याच्या राजकारणात जन्माला घातलं पण त्याला आता किती वाढू द्यायचे? याचा फेरविचार सी एम व्हायचं असेल तर जयंत पाटील यांना  शांत डोक्याने करावा लागणार आहे . आधी जयंत पाटील यांना  त्यांच्यावरती बसलेला 'जयंत जनता पार्टी ' हा शिक्का प्रत्यक्ष कृतीतून पुसावा लागणार आहे .  त्यांना आमदार सुरेश खाडे यांच्या विरोधात रोखठोक भुमिका घ्यावी लागणार आहे .  सी एम च्या रेसमध्ये जयंत पाटील सध्या सर्वात पुढं आहेत हे जगजाहीर आहे पण मिरजेत त्यानी असंच शेवटच्या क्षणापर्यंत मौन बाळगलं तर मिरजेची लढत ही नुरा कुस्ती आहे असं म्हणायला फट राहणार आहे . आणि त्याचा जयंतरावांच्या  सी एम पदावर विपरीत परिणाम होणार आहे.

 खासदार विशाल पाटील कॉंग्रेसच्या हितासाठी जयंत पाटील यांच्याशी जुळवून घेतीलही पण जयंत पाटील आता किती मोठं मन करतात? यावर बरंच काही अवलंबून आहे . 

  कॉंग्रेसचे विश्वजीत कदम सध्या  भाजप पुरस्कृत इडीच्या निगराणी खाली आहेत त्यांना भाजपच्या मगरमिठीतुन सोडविण्याचे आव्हान जयंत पाटील कसं पेलतात? हे बघावं लागणार आहे .

गतवेळच्या खासदारकीच्या निवडणुकीत कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी मिरज पॅटर्न वरती शेवटपर्यंत अंकुश ठेवला नाही . 

 त्यांनी भाजपचे संजय पाटील यांची खासदारकी वाचविण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न केले असते तर खासदारकीचं चित्र वेगळं दिसलं असतं . मतदानाच्या आधी शेवटचे दोन तीन दिवस सुरेश खाडे यांनी हालचाल केल्याचे दाखवले.आता अशा परिस्थितीत माजी खासदार संजय पाटील हे सुरेश खाडे यांना बळ देतील का मोहन व्हनखंडे यांना देतील ? हा प्रश्न आहे . माजी खासदार संजय पाटील हे त्यांच्या दिलदार शत्रुचेच होते आणि आजही आहेत . संजय पाटील यांची मिरज विधानसभा मतदारसंघात स्वतः ची एक व्होट बँक आहे . ती सुध्दा आगामी आमदारकीच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे . सध्या गॅसवर आहे तो मिरज पॅटर्न . मिरजेतल्या शहरी मतदारांनी पॅटर्न सुरेश खाडे यांच्या मांडीवर बसल्यानंतर पॅटर्नची चांगलीच खरडपट्टी काढल्या .  महापालिका निवडणुकीत स्वतः चं अस्तित्व कसं टिकवायचं? हा घोर पॅटर्नच्या कारभा-यांना लागलाय अशी एक चर्चा आहे . मतदारसंघातलं वारं सर्वात आधी या पॅटर्नच्या कानात शिरतंय आणि ते त्यांना ब-यापैकी कळतंय सुध्दा . हा पॅटर्न सध्या मोहन व्हनखंडे आणि  सुरेश खाडे यांनाही चुचकारतोय .पण शेवटच्या क्षणी तो मोहन व्हनखंडे यांच्या सोबतच जाण्याची दाट शक्यता आहे .

 सध्या सुरेश खाडे यांच्या कडे प्रचार यंत्रणा हालवणारा सक्षम प्रमुख नाही .  खाडे यांचे राजकारणातील सर्व कच्चे दुवे व्हनखंडे उगळुन प्यालेत . निवडणूकीच्या रणधुमाळीत व्हनखंडेनी एक एक पान उलगडायला चालु केलं तर मिरजेच्या आमदारकीचा नवा इतिहास लिहिला जाईल .  लोहा लोहे को काटता है या न्यायाने सध्या तरी पैसेवान असणाऱ्या खाडे यांना तुल्यबळ टक्कर द्यायला मोहन व्हनखंडे यांच्या सारखा पैसेवान माणूस नाही असं महाविकास आघाडी नेत्यांचं मत झालं तर  मिरज विधानसभा मतदारसंघात खाडे विरुध्द व्हनखंडे अशी  लागणारी खडी कुस्ती  लोकांच्या डोळ्याचं पारणं फेडणार आहे . मिरजेतील वॉन्लेस हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न कामगारमंत्री असतानाही सुरेश खाडे यांना सोडवता आला नाही .  साडेतीन वर्षे झाली कामगारांना पगार नाही आणि कामगारमंत्री म्हणतात ,

विकासकामाचा डोंगर उभारलाय ' मग यांना मतं कशी द्यायची? असा प्रश्न वॉन्लेस हॉस्पिटलचे अन्यायग्रस्त कर्मचारी विचारत आहेत . मिरजेची निवडणूक ही जातीय समिकरणावर लढवली जातेय .  दलित -मातंग समाजाने मेळावा घेऊन या समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे . एक गठ्ठा मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात गेलाय .  गोरगरीब मराठा आरक्षणाच्या आंदोलनात  कामगारमंत्री सुरेश खाडे   यांची बोटचेपी भुमिका  त्यांना त्रासदायक ठरणार आहे . धनगर आरक्षणाचा प्रश्न भाजप सोडवू शकत नाही अशी मतदारसंघात धनगर समाजाची भावना झाल्या .त्याचा फटका भाजपला बसणार आहे .  मिरज मतदारसंघातील  वाढत्या गुन्हेगारीवर मंत्री सुरेश खाडे यांचा अंकुश नाही अशी लोकांची भावना झाल्या .मिरज शहरात गॅंगवार डोकं वर काढतंय  . त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात मंत्री म्हणून खाडे कमी पडताहेत का ? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय .सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदारसंघातील सरबांधावरचे रस्ते शेतक-यांना खुले करुन देण्यात  मंत्री सुरेश खाडे यांना अपयश आलंय . त्यामुळे शेतकरी वर्गात खाडेंच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे . कॉंगसमध्ये प्रवेश केल्यानंतर  तातडीने मोहन व्हनखंडे यांनी कोंगनोळी ( ता.कवठेमहकाळ) येथे जाऊन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घेतली . बराच वेळ चाललेल्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली ? हे समोर आलेलं नाही पण सध्या महाविकास आघाडीत तिकिटाच्या स्पर्धेत मोहन व्हनखंडे हेच एक नंबरवर आहेत . बाळासाहेब होनमोरे, प्रमोद इनामदार  हे पुण्यातील निसर्ग कार्यालयात शरद पवार यांच्या समोर मुलाखती देण्यासाठी रांगेत उभे आहेत. बघुया आता नंबर कोण मारतंय ?

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.