हसन साहेब कागल तालुक्यात १० पैकी८ लोक म्हणतात मुश्रीफ नकोत.

 हसन साहेब कागल तालुक्यात १० पैकी८ लोक म्हणतात मुश्रीफ नकोत.




          



ॲड. विरेद्र मंडलिक

मुरगूड:

  हसन साहेब कागल तालुक्यात तुमच्या विरोधात नकारात्मकता वातावरण आहे दहा पैकी आठ जण नव्या चेहऱ्याची मागणी करत आहे महायुतीचा नवा चेहरा मीच आहे त्यामुळे मुश्रीफांनी माझ्या उमेदवारीची घोषणा करावी व उपकाराची परतफेड करावी अशी सनसनाटी मागणी युवा सेनेचे पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक वीरेंद्र मंडलिक यांनी केली .

 हसन साहेबांना उमेदवारी दिल्यास कागल तालुक्यातील अँटी  इन्कमबन्सीचा फटका महायुतीला बसण्याचा धोका पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षण एडवोकेट वीरेंद्र मंडलिक यांनी शिवसेना युवासेना पदाधिकारी मेळण्यात नियुक्ती पत्र वाटप करताना बोलत होते.

   सुरवातीला प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरवात झाली.  लोकसभा निवडणुकी महायुतीच्या नेत्यांचे हसन मुश्रीफ व  समर्जीत घाडगे  यांनी का ऐकले नाही याचा खुलासा त्यांनी करावा...

महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे  यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुक्यातील 121 गावात शिवसेनेचे भक्कम  संघटन उभे केले आहे .त्या बळावर गेली साठ वर्ष कागल तालुक्यात या प्रत्येक गावात मंडलिक गट म्हणून उभे केलेली कार्यकर्त्यांची अभैद्य फळी या जोरावर महायुतीकडून आपण कागल विधानसभा निवडणुकीत उतरत असल्याची भूमिका पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक एडवोकेट वीरेंद्र मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. 

शिवसेना युवा सेना पदाधिकारी नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एडवोकेट वीरेंद्र मंडलिक बोलत होते यावेळी तालुक्यात तालुका शिवसेनेचे अध्यक्ष सुधीर पाटोळे उपाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषदेत बोलताना एडवोकेट वीरेंद्र मंडलिक म्हणाले नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कागल तालुक्यातून दीड लाखाचे मताधिक्य देण्याची व लग्न करणाऱ्या करणाऱ्या नंतर संजय मंडलिक तीन लाख मतांनी पराभूत होणार होते अशी कोलाटी मारणाऱ्या हसनमुश्रीपांची भूमिका जिल्ह्याने अनुभवली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील साडेनऊशे गावात आमचे प्रभावी संघटन असताना महायुतीचे घटक पक्ष म्हणून आपली भूमिका राहिलेली आहे असा आरोप करत हसन साहेब तुमच्या विरोधात संपूर्ण तालुक्यात नकार फक्त वातावरण निर्माण आहे. दहापैकी आठ मतदार नव्या चेहऱ्याची मागणी करत आहे महायुतीच्या नवा चेहरा मीच आहे . त्यामुळे या निवडणुकीत मुश्रीफांचा पराभव होण्याची शक्यता आहे . त्याचा फटका महायुतीला होऊ शकतो. 

            या पार्श्वभूमीवर कागल तालुका विधानसभेची जागा शिवसेनेचीच आहे त्यामुळे या जागेवर शिवसेना शिंदे गटाचा आग्रह व हक्क आहे .त्यामुळेच माझी उमेदवारी महायुतीकडून प्रबळ आहे नुकत्याच पार पडलेल्या,खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संपर्क दौऱ्यात पदाधिकारी व युवा कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीची मागणी केली आहे. या संदर्भात संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना भेटून आपल्या उमेदवाराची मागणी करणार आहेत.


चौकट 

१)तुम्हा दोघांचे ठरले होते का? 

लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव झाला निकालानंतर अवघ्या पंधरा दिवसात हसन मुश्रीफ व संजय घाडगे एका व्यासपीठावर उतरतात एवढेच नव्हे तर पाठिंबा जाहीर करतात. व केडीसीसी संचालक पद बक्षीस मिळाली मग हे तुमचे आदेश ठरले होते का?

2). स्वर्गीय लोकनेते मंडलिक साहेबांचा प्रत्येक ठिकाणी मतासाठी फोटो वापरता मग त्यांच्या नातवाची उमेदवारी जाहीर करण्यात अडचण काय? 

  कार्यक्रमात प्रमुख मान्यवराची मनोगते झाली. यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला स्वागत संदीप ढेरे युवासेना जिल्हाप्रमुख यानी तर प्रास्ताविक शिवसेनातालुका अध्यक्ष सुधीर पाटोळे यानी केले शेवटी आभार नामदेवराव मेंडके यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.