विधानसभा निवडणूक आचार संहिता नाकाबंदी वाहनतपासणी करताना सातारा तालुका पोलिसांनी चक्क 1कोटी 5लक्ष 14हजार 500 रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत केला.

 विधानसभा निवडणूक आचार संहिता नाकाबंदी वाहनतपासणी करताना सातारा तालुका पोलिसांनी चक्क 1कोटी 5लक्ष 14हजार 500 रुपये एवढा मुद्देमाल हस्तगत केला.

---------------------------

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

अमर इंदलकर 

---------------------------

सदर गोपनिय माहितीच्या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा-राजीव नवले तसेच निलेश तांबे पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक विनोद नेवसे, सपोनि अनिल मोरडे, पोहवा राजु शिखरे, पोना किरण जगताप, पोकों संदिप पांडव, पोना सतिश बाबर यांनी सदर गोपनिय माहितीनुसार दिनांक 05/11/2024 रोजी सकाळी 11.00 वा चे सुमारास सातारा तालुका पोलीस ठाणेचे शेद्रे गावचे हददीमध्ये पुणे ते कोल्हापुर जाणारे हायवे रोडला हुंदाई क्रेटा कार क्रमांक एमएच 48 सीटी 5239 ही थांबवून गाडीतील दोन इसमांकडे चौकशी केली असता गाडीतील इसमांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तसेच सदर गाडीची तपासणी करणेस आडकाठी केल्याने गोपनिय माहितीची खात्री झाल्याने सदर ठिकाणी एफएसटी पथकाला पाचारण करणेत आले. एफएसटी पथक यांचे समक्ष व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये संपूर्ण गाडी तपासली असता सदर गाडीमध्ये मागील शिटमध्ये मोठी रोख रक्कम असलेबाबत निदर्शनास आल्याने  गाडीतील इसमांकडे सदर रकमेबात चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाहीत. व सदर रकमेबाबत खात्री वाटेल अशी कोणतीही बिल अथवा कागदपत्रे दाखविली नाहीत.


सदरहुन एफएसटी पथक यांनी सदर रकमेबाबत सदर टिकाणी व्हिडीओग्राफी पंचनामा करुन रक्कम ताब्यात घेण्यात आली असून सदर रक्कम शासकीय कोषागारमध्ये जमा करणेची तजवीज ठेवली आहे. तसेच सदर रकमेबाबत आयकर विभाग यांनाही अवगत करणेत आले आहे. सदरचे कारवाई अनुषंगाने हुंदाई क्रेटा कार क्रमांक MH 48 CT 5239 व दोन मोबाईल ताब्यात घेण्यात आलेले असून सदर बाबत पुढील कार्यवाही चालु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा, 

वैशाली कडुकर, यांचे मार्गदर्शनाखाली  उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा राजीव नवले तसेच

निलेश तांबे पोलीस निरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा पोलीस निरीक्षक  विनोद नेवसे, सपोनि अनिल मोरडे, पोहवा राजू शिखरे, पोना किरण जगताप, पोकॉ-संदिप पांडव, पोना- सतिश बाबर, पोना- प्रदिप मोहिते, पोहवा-दादा स्वामी, पोकॉं शिवाजी डफळे व पथक यांनी केलेली आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे समीर शेख,पोलीस अधीक्षक सातारा.श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.