न्यू इंग्लिश स्कूल सांगवडेवाडीच्या 1999 - 2000 इयत्ता दहावी बॅचचा स्नेह मेळावा मैत्रीचा उत्साहात संपन्न.

 न्यू इंग्लिश स्कूल सांगवडेवाडीच्या 1999 - 2000 इयत्ता दहावी बॅचचा स्नेह मेळावा मैत्रीचा उत्साहात संपन्न.

----------------------------------------

फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र 

सांगवडे प्रतिनिधी

 विजय कांबळे 

----------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी/ ता.10 सांगवडेवाडी ता. करवीर येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या 1999 - 2000 इयत्ता दहावी बॅचचा स्नेह मेळावा मैत्रीचा 24 वर्षांनी उत्साहात पार पडला. 

  यावेळी बोलताना, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एन. एस.पाटील म्हणाले, सध्याचा काळ हा नाती जपण्याचा आहे कुटुंब एकत्र राहिली पाहिजे अशा स्नेह मेळाव्यातून दुःख बाजूला ठेवून प्रत्येक जण आनंदाने घरी परतला पाहिजे त्यासाठी अशा स्नेह मेळाव्यांची गरज आहे. 

  मुख्याध्यापक रवींद्र खोचगे म्हणाले, अशा मेळाव्यातून एक ऊर्जा निर्माण होते शाळेतील गुरुवर्यांच्या घडलेल्या प्रसंगाच्या आठवणी उत्साह निर्माण करून जातात. 

   आफ्रिकेत असणारा विद्यार्थी विनोद जोशी यांनी व्हिडिओ कॉल द्वारे सहभाग दर्शविला व सर्वांशी संवाद साधला व अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी आठवणी सांगताना कधी हसण्याचे प्रसंग तर कधी डोळे पानावण्याचे प्रसंग डोळ्यासमोर उभे केले. 

     या माजी विद्यार्थ्यांनी शाळेला तीन सीसीटीव्ही कॅमेरे भेट दिले. त्यासाठी लागणाऱ्या उर्वरित साहित्यासाठीही प्रयत्न करूअसे आश्वासन विद्यार्थ्यांनी दिले.  

सन्मती पाटील यांनी प्रास्ताविक केले. विजय कांबळे (फोटोग्राफर) यांनी स्वागत केले. उमेश पाटील यांनी आभार मानले. महेश गुरव, धनंजय नाडगे, तात्यासाहेब पाटील, भाऊसो खोत, रेश्मा माने, महेंद्र माने यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी नियोजन केले. प्रकाश नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच विनोद जोशी,संकेत चौगुले, चेतन पाटील, , छाया मोळे, बंडू पारसे हे विद्यार्थी बाहेर गावी व प्रदेशात जॉबला असल्यामुळे काही कारणास्तव त्यांना येणे शक्य नसल्यामुळे त्यांनी आपल्या शाळेसाठी भेटवस्तू देण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.

     यावेळी शिक्षक डी.डी. नाडे, जे.ए. पाटील, ए. एम.महाजन,एस.पी. सूर्यवंशी, एन. एस. पाटील, विद्या नेर्लेकर, टी. एस. हुजरे, आर. आर. खोचगे, ए.पी.फटे, रामचंद्र जाधव व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.