2019 विधानसभा निवडणुकीची मला पडलेल्या मतांची टिमकी.

 2019 विधानसभा निवडणुकीची मला पडलेल्या मतांची टिमकी.

-------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

---------------------------------------

2009 मध्ये मिरज दंगल घडली ( मदनभाऊ व काँग्रेस कमकुवत करण्यासाठी घडवली गेली ? ) सदर मिरज दंगलीचा परिणाम सांगली,कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पडला. या दंगलीमुळे साधारण नऊ उमेदवार पराभूत झाले ज्यात काँग्रेस  पक्षाचे जास्त होते व काही मित्र पक्षांचे होते.ह्या सगळ्यांचा पराभव झाला तो

धर्मांध व जातिवादाचा मुद्दा उपस्थित करून आणि हे सगळे राजकारण घडले व 2009,2014 च्या निवडणुकीमध्ये  हे सगळे उमेदवार पराभूत झाले.



2019 च्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ते सर्व नऊ उमेदवार आपापल्या पक्षांच्या चिन्हावर निवडून आले मात्र सांगली विधानसभा मतदारसंघांमध्ये 2009, 2014 मध्ये निवडणूक हरलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार मदन भाऊ पाटील यांचे निधन झाले असल्यामुळे त्या जागेवर श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील यांनी उमेदवारी मागितली होती.त्यांना ती उमेदवारी अंर्तगत राजकारण असेल किंवा भाऊचे झालेले निधन यामुळे काँग्रेस पक्षाने त्याना उमेदवारी न देता, पृथ्वीराज बाबा पाटील यांना उमेदवारी दिली.



यावेळी श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील यांचे खच्चीकरण त्यांच्या जवळच्या सल्लागार कार्यकर्त्यांनी केले व भाजपचे वातावरण आहे सुधीर दादा गाडगीळ यांनी कामे प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेले आहेत 

आपला टिकाव लागणार नाही अशा पद्धतीने वहिनींची दिशाभूल केली.हे सगळे मांडायचा उद्देश्य हा आहे की,कार्यकर्त्यांनी केलेली दिशाभूल व पक्ष श्रेष्ठीनी तिकीट डावलने हा फैक्टर देखील पहावा लागेल.



2009 व 2014 मध्ये ज्या 9 ते 10 मतदारसंघांमध्ये झालेला पराभव पुसून या सर्व जागी पराभूत झालेले उमेदवार 2019  सर्व ठिकाणी निवडून आले, या उमेदवारांमध्ये अपवाद ठरली ती फक्त सांगली विधानसभा होती.त्याला कारण पक्ष श्रेष्ठी कडून चुकलेली सांगली विधानसभेची उमेदवारी,त्या ठिकाणी श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील असत्या तर किमान एक लाख पेक्षा जास्त मत घेऊन  निवडून येणाऱ्या कदाचित त्या सांगली विधानसभा क्षेत्राच्या पहिल्या महिला आमदार असत्या.मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचे नवखे उमेदवार असल्याने त्यांना निसटता पराभव स्वीकारला लागला.



हे वास्तव आहे गेल्या दहा वर्षातील अँटी इन्कमन्सी ही होती.तसेच महापुराचे कारण होते व पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारण होते हे नाकारून चालणार नाही.

बऱ्याच ठिकाणी चर्चा होतात की मदन भाऊ होते मदन भाऊंना 65000 च्या वर मते गेली नाही मात्र आम्हाला पहिल्याच याच्यात 85000 मत पडली 

सर्व बाबींनी विचार केला तर ही बाब लक्षात येते अन्यथा फक्त हाच प्रपोंडा केला जातो की दादा घराण्याच्या बाहेरचा उमेदवार असेल तर त्याला चांगली मत पडतात.ही मांडणी करताना मदन भाऊ पाटील यांच्या समर्थकांच्या योगदानाचा बळी देऊन स्वतःची वाहवा मिळवली जाते हे दुर्दैवी आहे.



ज्या पद्धतीने काँग्रेस पक्षात सारखे मुंबईला जाऊन दिखावा केला जातो मात्र परिस्थिती तशी नाही, असे माझे राजकीय गणित आहे.त्या निवडणुकीत सर्वात महत्वाचा फैक्टर ठरला तो मराठा विरुद्ध ब्राह्मण वादाचा,ज्यात मराठा समाजाला एक विशिष्ट पद्धतीने काही लोक हाताशी धरून स्वताकडे वळवण्यात त्याना यश आले होते.मदन भाऊ यानी राजकारण करताना कधी जातिवाद केला नाही मात्र यामुळे त्यानी मराठा,मुस्लिम,क्रिस्चन,जैन,सीख,लिंगायत समाजासाठी कार्य करण्याचा प्रयत्न दुर्लक्षीत करता येणार नाही.मिरज दंगली मुळे भाऊंचा पराभव झाला आणि काही काळाने भाऊचे निधन झाले.आज ही अनेक लोक केवळ मदनभाऊ यांच्यावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी काँग्रेस पक्षाला मतदान करतात.

आता सांगण्याच कारण की इतर वेळेला आपण ह्या गोष्टी केले की त्याला महत्त्व येत नाही.आता विधानसभेच्या निवडणुकीचे रान तापलेले आहे त्यामध्ये अशा चर्चा केल्या की त्याच्यावर लक्ष वेधलं जातं आणि त्याच्यावर सांगोपांग चर्चा होते. काही मुद्दे आमचे बरोबर असतील अथवा चुकीचे असतील त्याच्यावर चर्चा होईल व आत्मपरीक्षण होईल एवढाच प्रपंच,मात्र जिथे जवाहरलाल नेहरू,इंदीराजी गांधी,राजीव गांधी,यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांच्या सारख्या देश आणि राज्याच्या निर्मितीत ज्यांचे योगदान आहे त्यांच्या नंतर देखील पक्ष चालला,लढला आणि जिंकला हे लक्षात घेऊन,आपण नसता तर आणखी कोणी तरी असता मात्र पक्ष चाललाच असता,शेवटी काँग्रेस म्हणजे बंड आणि संघर्ष यापेक्षा वेगळे काहीच नाही.  .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.