राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत मतदानामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत मतदानामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
----------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगवडे प्रतिनिधी
विजय कांबळे.
----------------------------------------
सांगवडे प्रतिनिधी-: कोल्हापूर जिल्हा दक्षिण 274 विधानसभा मतदार संघामधील सांगवडे या गावांमध्ये उच्चांकी मतदान. या गावांमध्ये तीन वार्ड आहेत वार्ड क्रमांक एक मध्ये1234 मतदान, वार्ड क्रमांक दोन मध्ये 1200 मतदान, वार्ड क्रमांक तीन मध्ये 1029 मतदान आहे.
वार्ड क्रमांक एक मध्ये 1234 पैकी 1075 मतदान झाले त्यामध्ये पुरुष 572 स्त्रिया 503 या वार्डा मध्ये 87% मतदान, वार्ड क्रमांक दोन मध्ये 1200 पैकी 995 मतदान त्यामध्ये पुरुष 498 स्त्रिया 497 या वार्डामध्ये 82% मतदान, वार्ड क्रमांक तीन मध्ये 1029 पैकी 841 मतदान त्यामध्ये पुरुष 419 स्त्रिया 422 या त्या वार्डामध्ये 81% मतदान झाले. सांगवडे गावांमधील एकूण मतदान 3463 इतके आहे त्यापैकी 2911 इतके मतदान झाले आहे. सरासरी गावांमध्ये 84% मतदान झाले 2019 पेक्षा मतदानचा टक्केवारी आकडा हा दहा टक्क्यांनी वाढला गेला. आज सकाळी सात पासून संध्याकाळी सहा पर्यंत कधी नाही घडलं असं घडलं गेलं की हा मतदानचा टक्केवारी आकडा वाढवण्यामध्ये सर्व महिला यशस्वी झाल्या. राज्यामध्ये सगळीकडेच महिलांच्या मुळे मतदानाचा टक्केवारी आकडा हा वाढला गेला महिलांची प्रत्येक मतदान केंद्रावर प्रचंड अशा गर्दीच्या रांगा लागल्या होत्या. महिलांनी भर उन्हातही मतदान करण्याचा निर्णय ठाम केला होता त्यामुळे सगळीकडेच मतदानाची टक्केवारी वाढली. मतदानाच्या टक्केवारीचा आकडा वाढवण्यामध्ये महिलांचा मोठा प्रतिसाद आहे.
Comments
Post a Comment