उचगावात व मानपा हद्दीत विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पाच बांधकाम धारकावर नगररचना विभागाकडून गुन्हा दाखल.

 उचगावात व मानपा हद्दीत विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी पाच  बांधकाम धारकावर नगररचना विभागाकडून गुन्हा दाखल.


--------------------------- 

कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

--------------------------- 

गांधीनगर :-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश डावलून व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागाची परवानगी न घेता तसेच बांधकाम थांबवण्याची नोटीस देऊनही   विनापरवाना आणि बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी संजय हेमंत चुघानी, आशीर्वाद निवास गांधीनगर, विशाल घनश्याम खूबचंदानी, शांती प्काश कॉम्प्लेक्स  गांधीनगर, वर्षा सुंदरदास जेवरानी, गणेश टॉकीज जवळ गांधीनगर, विशाल महेशलाल नरसिंघानी , आकाश महेशलाल नरसिंघांनी गांधीनगर ता  करवीर,जिल्हा कोल्हापूर या बांधकाम धारकावर, गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . याबाबतची फिर्याद कोल्हापूर महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे  कनिष्ठ  अभियंता अरुण कुमार दत्तात्रय गवळी (रा. कसबा बावडा ता करवीर) यांनी दिली.


याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी उचगाव  ता करवीर गावच्या हद्दीत गट क्रमांक 96/4/अ/क आणि  या जागेवर नगर रचना विभागाची परवानगी न घेता तसेच सर्वोच्च न्यायालयाचा 3/5/2018 रोजीच्या जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश डावलून व ना विकास क्षेत्रात तसेच पूर नियंत्रण रेषेत असणाऱ्या गटामध्ये बांधकाम सुरू ठेवल्याने आणि वेळोवेळी बांधकाम थांबवण्याच्या नोटीस देऊनही संबंधित बांधकाम धारकांनी अनाधिकृत रित्या बांधकामे सुरू ठेवली आहेत त्यामुळे सविस्तर बांधकामाचा    पंचनामा शासकीय अधिकाऱ्यांनी करून  अधिनियम 1966 तरतुदी मधील कलम 52,54,(2) कलम 43 या कायद्याचा भंग करून बांधकाम सुरू ठेवले आहे या कारणावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात पाच बांधकाम धारकावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शीला बेंद्रे करीत आहेत. 

दरम्यान शासकीय अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता वेळोवेळी बांधकाम थांबवण्याच्या नोटिसात देऊनही ते न थांबवता बांधकाम सुरूच ठेवले. त्याबद्दल फौजदारी गुन्हे दाखल केले. आणि हे जर थांबले नाही तर ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तजबीज ठेवली आहे.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.