किसन वीर महाविद्यालयात देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन.

 किसन वीर महाविद्यालयात देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

अटल बिहारी वाजपेयी हे पोखरण अणुचाचणी करणारे धाडशी पंतप्रधान होते. ते भारत देशाचे सुसंस्कृत व दूरदृष्टीअसणारे समाजकारणी होते. ते कुशाग्र बुद्धीचे व वैज्ञानिक दृष्टिकोन जपणारे जनसामान्यांचे नेते होते. त्यांनी आपल्या कार्याच्या जोरावर देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले. राजकारणात त्यांनी लोकशाही तत्त्वांचा अवलंब केला. त्यांनी शेजारील देशांशी सलोखा व बंधुभाव प्रस्थापित करण्यावर भर दिला. ते सामाजिक एकता व महिला सबलीकरणाचे खंदे पुरस्कर्ते होते. असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाचे प्राभारी प्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांनी केले. 

 येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर समितीच्या वतीने आयोजित केलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. सुरुवातीस प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे यांच्या हस्ते अटलबिहारी वाजपेयी  यांच्या प्रतीमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट तसेच श्री. जयवंत खोत. श्री. संतोष मुळीक, डॉ. अमोल कवडे श्री. मनोहर मंगवडे, श्री. सोमनाथ सानप यांची विशेष उपस्थिती होती. 

प्रा. डॉ. झांबरे  म्हणाले की अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आपण सुशासन दीन म्हणून साजरा करतो. त्यांनी देशाच्या विकसासाठी भरीव योगदान दिले. अटल बिहारी वाजपेयी हे प्रभावी परराष्ट्रमंत्री होते. ते उत्तम विरोधी पक्षनेते होते. भारतीय राजकारणात त्यांचे सर्व राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध होते. ते संयमी राजकारणी, प्रभावी वक्ते व लेखक होते. त्यांची राजकिय कारकीर्द अतुलनिय व गौरवशाली होती. यामुळे त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भरतरत्न देवून गौरविण्यात आले.

स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविकात सदर कार्यक्रमाचा उद्देश व देशाच्या जडणघडणीत अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान विशद केले. श्री. जयवंत खोत यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सचिन कुंभार व श्री. विशाल महांगडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.