कुंभोज येते नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
कुंभोज येते नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
------------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
कुंभोज तालुका हातकणंगले येथे आरपीआयच्या वतीने नामदार रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माजी सरपंच किरण नामे व आरपीआय गटाच्या वतीने कुंभोज परिसरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आरपीआयच्या वतीने एसटी स्टँड परिसरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाने संचालक अमित साजनकर व महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अजित गोपुडगे यांच्या हस्ते केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी परिसरातील वृद्धाश्रमात फळांचे वाटप ,विद्यार्थ्यांना शालेय पुस्तक वाटप अशा विविध कार्यक्रमांच्या आयोजन माजी सरपंच किरण नामे व आर पी आय कुंभोज च्या वतीने करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कुंभोज व परिसरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार माजी सरपंच किरण नामे यांनी मांनले.
Comments
Post a Comment