कोल्हापूर थेट पाईप लाईन कामाची आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी.
कोल्हापूर थेट पाईप लाईन कामाची आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी.
----------------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
------------------------------------
थेट पाईपलाईन मधून कोल्हापूर शहराला होणारा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत आहे. अमृत योजनेतून उभारल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्यांचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या संदर्भात आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात येणाऱ्या पाणी टाक्यांपर्यंत पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या. प्रस्तावित टाक्यांपैकी 7 टाक्यांचे काम 10 जानेवारी पूर्वी पूर्ण झाले पाहिजे तसेच उर्वरित टाक्यांपैकी 4 टाक्या जानेवारी महिनाअखेर पूर्ण झाल्या पाहिजेत असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले तसेच 3 टाक्यांचे काम मार्च अखेर पूर्ण करावे अशा सूचना देत जलवाहिन्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरवासीयांची पाणी टंचाई पासून कायमची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळे कुणीही कामात दिरंगाई करू नका अशा स्पष्ट सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
यानंतर पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
Comments
Post a Comment