शाहुपुरी पोलिसांनी कोट्यावधीची रोख रक्कम केली हस्तगत.

शाहुपुरी पोलिसांनी कोट्यावधीची रोख रक्कम केली  हस्तगत.

--------------------------- 
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी

शशिकांत कुंभार 

---------------------------

 दिनांक 27/12/2024 रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाटलाचा वाडा या हॉटेलच्या मागे, नागाळा पार्क कोल्हापूर येथे  किरण हणमंत पवार रा. देवापुर ता माण, जि सातारा तसेच त्याचा साथीदार आण्णा सुभाष खडतरे रा केळकर,हॉस्पीटल जवळ, खडतरे गल्ली, सांगोला, जि सोलापुर व त्याच्या ताब्यात असलेल्या मारुती ब्रिजा कार नंबर KA-51-ML-4552 मध्ये बेकायदेशीर रोख रक्कम मिळुन आल्याने त्यांच्या  ताबेतील रक्कमेबाबत अधिक चौकशी केली असता सदर रक्कमेच्या सदंर्भात त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे  न  दाखवल्यामुळे   सदरची रक्कम आयकर विभागाचे अधिकारी अमोल अविनाश पंढरपुरकर [ आयकर निरीक्षक ], विनयकुमार दुबे [आयकर निरीक्षक ] यांचे उपस्थीतीत पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी शासकीय पंचांच्या उपस्थीतीत बेकायदेशीर रोख रक्कम एकुण 1,98,99,500/- रुपये जप्त करुन पुढील कारवाई करीता ताब्यात घेतली आहे बेकायदेशीर रोख रकमेबाबत  आयकर विभागाकडून कार्यवाही सुरु आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत   आप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई मॅडम व  उप विभागीय पोलीस अधीकारी  अजित टिके  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  संतोष डोके व त्याच्या पथकातील सपोनि विशाल मुळे, श्रेणी पोसई संजीव बबरगेकर, पोहेकॉ तानाजी चौगले, दयानंद पाटील, पोना चंद्रशेखर बांटुगे, पोकॉ दिंगबर कुभांर, रत्नदिप जाधव, मपोकॉ तूजा सावंत यांनी  केली.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.