हभप गुरवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन.
.हभप गुरवर्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह,ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन.
------------------------------
लोहा प्रतिनिधी
आंबादास पवार
------------------------------
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हभप वेदांत केसरी परम पूज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांच्या ५४ व्या पुण्यतिथी निमित्त हभप गुरूवर्य विमान महाराज पालमकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२० डिसेंबर ते दि.२७ डिसेंबर पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन शहरातील नगरेश्वर मंदीरात करण्यात आले आहे.हभप गुरूवर्य विमान महाराज पालमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी ५ ते काकडा,६ ते ७ श्रीस अभिषेक,८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,३ ते ४ गीतापाठ,४ ते ५ प्रवचन,६ ते ७ हरिपाठ,९ ते ११ हरि किर्तन अशी कार्यक्रमाची रूपरेषा आहे.
दि.२० डिसेंबर पासून २६ डिसेंबर पर्यंत अनूक्रमे प्रवचकार श्री हभप सखाराम महाराज पालमकर, श्री हभप सदानंद महाराज रायवाडीकर,श्री हभप शंकर गुरूजी गायकवाड,श्री हभप मारोती महाराज दांगटे,श्री हभप केशव गुरूजी चव्हाण,श्री हभप भानूदास महाराज हळदवकर,,श्री हभप नामदेव गुरूजी कळसकर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले आहे.तर सप्ताहात दररोज नियमितपणे अनूक्रमे किर्तनकार श्री हभप गोविंद महाराज आनंदवाडीकर, श्री हभप ज्ञानेश्वर महाराज कुंडगीर बोथी,श्री हभप दिपक महाराज पांगरेकर,,श्री हभप लक्ष्मीकांत महाराज लोहा, श्री ह भ प अमोल महाराज कारेपूरकर,,श्री हभप भगवान महाराज महालिंगी कर,श्री वे.शा.सं.शरद महाराज देगलूरकर यांचे होईल.याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त आर्य वैश्य समाजबांधवांच्या,आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
गुलालाचे किर्तन दि.२६ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्री ह भ प गुरुवर्य वामन महाराज पालमकर यांचे होईल.तर काल्याचे किर्तन दि.२७ रोजी शुक्रवारी सकाळी ९ ते ११ या वेळेत सखाराम महाराज पालमकर यांचे होईल.
*भव्य मिरवणूकीचे आयोजन*
प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी ह.भ.प.वेदांत केसरी परम पुज्य रंगनाथ महाराज परभणीकर यांची पुण्यतिथी दि.२० डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार आहे. दि.२७ डिसेंबर रोजी शुक्रवारी नगरेश्वर मंदिर पासून भव्य दिव्य मिरवणूक निघणार असून सर्व समाज बांधवांनी या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.आर्थिक मदत तर सर्वांनी भरभरून दिली आहे.पण या दिवशी सर्वांनी आपापली प्रतिष्ठाणे दुपारी २.०० वाजेपर्यंत बंद ठेवून मिरवणूकीस प्रचंड प्रतिसाद द्यावा. मिरवणुकीत सहभागी होताना पुरषांनी पांढरे शर्ट व पांढरी पँट परीधान करावी.महिलांनी एक सारखी किंवा एकाच रंगाची साडी परीधान करावी.मिरवणुकीत सर्वांनी शिस्तीचे पालन करायचे आहे.कोणत्याही पुरुष किंवा महीलांनी रस्त्याने डान्स करु नये.मिरवणुकीनंतर लागलीच नगरेश्वर मंदिरात आयोजित केलेल्या महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती. असे आव्हान
अध्यक्ष व समिती आयोजक
नगरेश्वर मंदिर लोहा.यानी केले आहे
Comments
Post a Comment